Friday, January 10, 2025
Homeसाहित्यआधुनिक दूर्गा

आधुनिक दूर्गा

पिंपळपान -१

माझी अगदी जवळची खास मैत्रीण. हो,  दुर्गाने काल मला रात्री फोन केला. ‘अगं, मला तुझ्याशी बोलायचे आहे’. आम्ही नेहमीच बोलतो फोनवर पण, मी म्हणाले, ‘अगं, माझा उद्या शेवटचा पेपर आहे, अभ्यास करतेय. ऊद्या खुप बोलू या, चालेल ना’?  तिने ठीक आहे म्हणत नाराजीनेच फोन ठेवला. माझ्या मनात आलं, असं काय बोलायचं असेल तिला?

नो सेकंड थाॅट असे, मनाला बजावत अभ्यासात एकाग्रता आणायचा मी प्रयत्न केला. डोकं अभ्यासात खुपसलं. एक दिवसां आड परिक्षा देऊन मी जाम पकली होते. ऑफिसच्या प्रमोशनचे नऊ महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. जवळ जवळ रोजच परिक्षा असे. एक एक मार्क महत्वाचा होता. रात्री उशिरा झोपले.

सकाळी ऑफिसला निघायच्या आधी वर्तमानपत्र वरवर चाळायला घेतले आणि पहिल्याच पानावर छोटी बातमी वाचली. लक्ष लागेना लगेच दुर्गेला फोन केला. काय ग! तुमच्या ऑफिस मधली बातमी छापली आहे. कोण ते सर? कोण ग ती मुलगी? चांगलीच अद्दल दिली सरांना. तिचे कौतूक करावे तेवढे कमी, मानलं हं तिला. कोण ती? नाव काय तिचं?

ती अगदी थंड पणे म्हणाली, मीच ती! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ‘दुर्गा, तू डेअरिंग केलेस? मानलं तूला. तू काहीही काळजी करू नको. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आज माझ्या परिक्षा प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आहे. घरी आल्यावर तुझ्याशी बोलते’ असे म्हणत फोन ठेवला. विचारांचे चक्र गरगर फिरू लागले.

माझ्याशीच मनमोकळेपणे बोलणारी दुर्गा काल किती नाराज झाली असेल? तिच्या कार्यालयातले एक वरिष्ठ अधिकारी तिच्याशी जरा जास्तच विषयांतर करत असंबंधित बोलत असत. ती मला नेहमी म्हणत असे, ‘तूला माहित आहे ना? तू मला कित्येक वर्षे ओळखते. अश्या लोकांचा मला खुप राग आहे. मला काहीतरी त्यांच्या विरोधात करावे लागेल. आम्ही स्त्रीया नोकरी निमित्त बाहेर पडतो कुणी काही अन्याय केला तर मला जराही सहन होत नाही मी सबला आहे. अबला नाही. पटवून अद्दल शिकवणार’.

मी मैत्रिणीच्या नात्याने समजावले ‘अगं, तू लक्ष देऊ नकोस. तू मेडिकल ग्राउंड वर आली आहेस तब्येत सांभाळ. तू दूर्लक्ष करत मध्यस्थी कडून काम करवून घे’.

दूर्गाला मी पंधरा वर्षे ओळखते. आम्ही कित्येक वर्षे एकत्रच एकाच कार्यालयात काम करत होतो. कार्यालयात आमचं जाण येणं, जेवणं एकत्र असे. तिचा स्वभाव  मानी, कामात हुशार, राहणं व्यवस्थित टापटीप, सर्वात राहून थोडी अलिप्त.  रस्त्यातून चालताना कुणाचा धक्का लागला तर चार शब्द सुनावल्याशिवाय पुढे पाऊल न टाकणारी. एकंदरीत, कुणी छेडछाड केली तर तिच्यात दुर्गा अवतरत असे.

स्त्रीवर अन्याय, अत्याचार झाला की ती उखडायची.
बदमाश पुरूषांना अद्दल घडली पाहिजे. स्त्रीला आदर मिळालाच पाहिजे. अगदी नावाप्रमाणेच दुर्गा.
खूप स्वाभिमानी. काही वर्षानी आमची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली पण आमची मैत्री कायम होती.

त्या दिवशी कार्यालयातील सर्व कर्मचारी कुठले तरी आंदोलन होते म्हणून बाहेर गेले होते. कार्यालयात एक दोन वरिष्ठ अधिकारी व एक दोनच स्टाफ होता. दुर्गा काम संपवून निघतच होती.तेवढ्यात फोन आला, साहेबांनी फाईल घेऊन बोलावले आहे. तिला जावेच लागले. कामाचे बोलणे झाले म्हणून ती निघणार तेवढ्यात साहेबांनी नसत्या चौकश्या सुरू केल्या. तुमच्या घरी कोण कोण राहतंएवढ्यापर्यंत ठीक होतं. पुढे पुढे असंबंधित प्रश्न विचारायला लागले तेव्हा हिचा पारा चढला. तेव्हा तडक ती बाहेर गेली आणि दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तिने हा प्रकार सांगितला व म्हणाली मला लेखी तक्रार करायची आहे नावासकट आणि तक्रार लिहून निघाली.

बातमी सर्वत्र पसरली. ‘त्या’ सरांना सर्व कर्मचारी महिलांनी घेराव घातला. तिकडेच चांगली अद्दल दिली.
वर्तमानपत्रात बातमी छापून आली. मिश्र प्रतिसाद येऊ लागले. त्या सरांना सबक हवीच होती. काही महिला पुढे येऊन म्हणाल्या, ते आम्हाला पण असे तसे काहीही प्रश्न विचारायचे की ऊत्तरे देतांना किवां बोलताना त्रास व्हायचा. काही जणी म्हणत तू नावाप्रमाणेच वागलीस. योग्य तेच केले. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. काही जणी म्हणत, ‘हो एवढं काय, असं तसंच असंबंधितच प्रश्न विचारले ना? काही शारिरीक तर त्रास दिला नाही ना.?’
अश्या प्रतिक्रियेचा तिला खुप राग यायचा, मग रडत रडत बाहेर यायचं.

हे बोलणं ही पाप आहे. स्त्रीच्या खाजगी जीवनाबद्दल, कार्यालयात का कुणी विचारावं? इथेच चुकतं. पहिल्या वेळीच फटका दिला पाहिजे आणि तूम्ही काही बायका असं बोलता म्हणून या बदमाष पुरूषांचे फावते. तिथेच सडेतोड उत्तर दिले पाहिजे. काही बायकांची विचारसरणी बघून किव येते, असं तिचे म्हणणे होते.

काही महिन्यांनी तिला न्याय मिळाला. त्या साहेबांचा निलंबित केल्याचा आदेश निघाला. ही बातमी पण वर्तमानपत्रात छापून आली. दृर्गाला अभिनंदनाचे फोन खणखणायला लागले. खरंच, प्रत्येक स्त्रीने आधुनिक दुर्गेचा अवतार धारण केल्याशिवाय समाजातील स्त्रीयांच्या छळाचे प्रकार थांबणार नाहीत.

लेखिका – पूर्णिमा शेंडे.

– लेखन : पूर्णिमानंद.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. छान प्रसंग वर्णन वाचले असे वाटले. आणि धडा पण देऊन जाते ही गोष्ट.

  2. खुपच छान…लिहिलंय
    कथेत प्रेरणादायक जोश आहे..
    पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल..अशी कथा नक्की

    आहे👌🏻👌🏻👍👍

  3. I think it is base on true story and well written by purnimanand. Story written by purnimanand in simple language and easy to understand. I request writer to keep writing .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Gauri Joshi Sadvilkar on संगीत
आशी नाईक on संगीत
Pratibha Saraph on नकळत
प्रवीण श्रीराम देशमुख on सार्थक करू या जन्माचे
प्रवीण श्रीराम देशमुख on माझी जडणघडण : ३१
प्रवीण श्रीराम देशमुख on माझी “एडिटोरियल अरेस्ट !”