“निसर्गा होऊ कसे उतराई ?” हे ६ जून २००४ रोजी प्रकाशित झालेले पुस्तक माझ्या नुकतेच वाचनात आले.
या पुस्तकाचे लेखक श्री दिलीप गडकरी हे रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथील रिलायंन्स इंडस्ट्रीज मध्ये नोकरीस होते. त्या कंपनीतर्फे दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त लेखन स्पर्धा घेण्यात येत असत. त्यात त्यांना दरवर्षी बक्षिसं मिळत. त्याच प्रमाणे इतर संस्थांतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेतील बक्षिसपात्र लेखांचे या पुस्तकात संकलन करण्यात आले आहे. त्यापैकी काही लेखांचे आकाशवाणी मुंबई केंद्रावर वाचन करण्यात आले होते.
पर्यावरण संवर्धनासाठी ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी, अगतिक वसुंधरादिन, भारतातील वनांची दैना, सर्प मानवाचा मित्र, पर्यटन व पर्यावरण, दुर्लक्षित अरण्यमित्र संमेलन, वनभक्षक वणवे, इत्यादी सतरा लेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
अवघ्या साठ पानी पुस्तकात असलेले सतरा लेख लहान असले तरी उपयुक्त माहिती असलेले आहेत. स्पर्ध्येत भाग घेणाऱ्यांसाठी, विद्यार्थांसाठी तसेच सर्व पर्यावरण प्रेमींसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे.

– लेखन : सौ.संपदा राजेश देशपांडे. पनवेल
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800