मुंबईतील गोरेगाव शिक्षण मंडळ आणि क्षेमकल्याणी बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव पश्चिम येथील डोसीबाई जीजीभाय शाळेत पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन, ज्येष्ठ पत्रकार रवी माहीमकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन असे अनेक साहित्य प्रकार तसेच लहान मुलांसाठी हिंदी, ईंग्रजी मराठी पुस्तके दिवाळी अंक आहेत.
हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू आहे. तरी साहित्य प्रेमींनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

– लेखन : मोहनदास मुंगळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800