स्पर्धेच्या या युगात पळतात ही माणसं
सुखासीन जगणाऱ्यांना छळतात ही माणसं
न्यायनीतीच्या गप्पा हमखास मारणारे
वासनेची शिकार शोधतात ही माणसं
परस्त्री मातेसमान शिकवण असे आमुची
तरीही बलात्काराकडे झुकतात ही माणसं
एकविसाव्या शतकात विसावा कसा आटला
समाधानासाठी कशी धडपडतात ही माणसं
सोशल मिडीयाच व्यसन हे सुटता सुटेना
आपलेपणाला मग दूरावतात ही माणसं
जाती धर्माच्या द्वेषानं पेटतो कधी वणवा
सूडाच्या आगीत कशी जळतात ही माणसं
ज्यांच्यावर होता भरवसा ते साथ सोडून गेले
संकटकाळी खरे कळतात ही माणसं

– रचना : चंद्रशेखर धर्माधिकारी. वारजे, पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान कविता!! माणसांचे आकलन करवून देणारी !!
Khup sundar kavita Prabhavi mandani.
आपलेपणाला मग दुरावतात ही माणसं……खरंच आजची परिस्थिती मांडली आहे… कविता नेहमी प्रमाणे अर्थ पुर्ण आणि मनात जागा करणारी.
This is really true. Simply superb thought.
You are great sir, congratulations and all the best for future.