चंद्रपूर जिल्ह्यातील राजगोंड आणि कोलाम यांच्यासह इतर काही जमातींचा गुस्साडी-दंडार संस्कृती “गुस्साडी” हा एक प्राचिन लोकनृत्य प्रकार आहे. दंडार मध्ये पंधरवडा उत्सवात ते सादर करतात.
या जिल्ह्यातील जिवती, कोरपणा, राजुरा वस्त्यामध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उत्साह पसरलेला आहे. राजगोंड आणि कोलाम यांच्यासह आदिवासी जमाती पारंपारिक व शतकानूशतके जुन्या घुसाडी नृत्यामुळे रंगीबिरंगी पोशाख परिधान केलेले आणि दागिन्यांनी सजलेले, टोळ्यात गाणे आणि नाचत शेजारच्या गावांना भेट देतात. हा काही काहीसा परस्पर विधी आहे ज्यात रहिवासी पुढच्या वेळी पाहुण्यांना तेच देतात.
दिवाळीच्या आधीच्या दहा दिवसात तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात आदिवासी गावांचे एका उत्सवाच्या आखाड्यात रूपांतरित होते. राजगोंड आणि कोलाम यांच्यासह आदिवासी जमाती आनंदाने दंडारी भुसाडी नृत्य उत्सव साजरा करतात.
वांशिक नृत्य हे आदिवासी गोंडीयन संस्कृतीचे एक आनंददायक दृश्य प्रदर्शन आहे. आदिवासींना भेडसावणाऱ्या प्रमुख समकालीन समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हे एक व्यासपीठ प्रदान करते.
प्रामुख्याने कृषीप्रधान समुदाय असलेल्या या जमातीचे धार्मिक सण हे शेतीच्या हंगामा भोवती फिरत असतात. दंडारी घुसाडी हा कापणीनंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दिवाळीत दंडार भरविला जातो. या दंडारीला “सातशे आकडा, नवशे बेताल” म्हणजेच ७०० मैदान, ९०० प्रकारचे कवायत, खेळ यालाच “आखाडा” असे म्हणतात.
दिवाळीच्या निमित्ताने सर्व समुदाय एकत्र येऊन ज्यांच्या घरी आखाडा असतो त्याच्या घरी एकत्र येतो व उत्सव केला जातो. यात प्रामुख्याने महिला व पुरुष मंडळीचा सहभाग असतो. महिला नर्तक सुद्धा विविध आभूषणे परिधान करत शेजारी असलेल्या गावांना भेटी देऊन पूर्वजांचे, गोंडी संस्कृतीचे, देवीदेवतांचे गाण्याच्या माध्यमातुन स्मरण करित नाचत असतात.
“येथमासुरपेन” किंवा आत्म्याचा देव आणि जंगो देवीची पूजा करतात. जसे की, डप्पू, घुमेला, ढोल, वेट्टे, परा, पेपरी आणि तुडूम अशी वाद्ये वाजवून दंडारी नृत्य मंडळाचे सदस्य कुटुंबातील फक्त पुरुष सदस्य मोरांच्या पिसांची पगडी, हरणाची शिंगे, कृत्रिम दाढी आणि मिशा आणि त्यांचे शरीर झाकण्यासाठी बकरीचे कातडे घालतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडावर वसलेल्या जिवती तालुक्यात समृद्ध वारसांचा समानार्थी बनलेला दिवाळी सण दूरवरच्या ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतो. प्रभावीपणे पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि पंधरवडच्या चौदाव्या दिवसाच्या पर्यंत चालतो.
या उत्सवाच्या निमित्ताने निश्चितच प्रेरणा मिळते. अशा उत्सवामुळे जुन्या होत चाललेल्या वारश्यांचे व संस्कृतीचे जतन होते. अशा प्रकारे आजच्या काळातही आदिवासी जमातीतील गोंड, कोलाम, परधान यांच्यासह आदिवासी जमाती संस्कृतीचे जतन व संवर्धन करीत आहेत.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा……
– लेखन : लक्ष्मण दौलतराव मंगाम. जिवती, जि.चंद्रपूर
– समन्वय : शत्रुघ्न लोणारे
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
खूपच छान माहिती..