Saturday, July 5, 2025
Homeबातम्यामध्य रेल्वे : स्वच्छता मोहीमा

मध्य रेल्वे : स्वच्छता मोहीमा

मध्य रेल्वेने स्वच्छता आणि सुशासनाच्या दिशेने 624 स्वच्छता मोहीमा पूर्ण केल्या.

दि. 2.10. 2022 रोजी सुरू झालेल्या भारत सरकारच्या ‘विशेष स्वच्छता मोहिम 2.0‘ मध्ये मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन, 24.10.2022 पर्यंत 624 मोहिमा पूर्ण केल्या. यामध्ये रेल्वे स्थानके, रेल्वे परिसर, ट्रॅक, कार्यशाळा, रेल्वे वसाहती इत्यादी ठिकाणच्या स्वच्छता मोहिमांचा आणि कार्यालयातील प्रलंबित बाबींचा निपटारा करणे सुनिश्चित करण्याचा समावेश आहे.

विशेष मोहीम 2.0′ च्या तत्त्वानुसार, मध्य रेल्वेने स्वच्छता मोहिमेसाठी, सर्व 466 स्थानके हाती घेतली आहेत. रेल्वे स्थानकांच्या यांत्रिक साफसफाईवर विशेष भर देण्यात आला असून रेल्वेगाडी आणि स्थानकांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने यापूर्वीच रेल्वे स्थानके, कार्यालये, कार्यशाळा, रेल्वे कर्मचारी वसाहती इत्यादींचा समावेश असलेल्या 624 हून अधिक स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या आहेत. या मोहिमेदरम्यान, इतर अनेक उपक्रम देखील घेतले गेले आहेत. ज्यात ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी आणि विविध प्रलंबित संदर्भांचा निपटारा करण्यासाठी माहीती तंत्रज्ञानाचे ॲप्लिकेशन्स विकसित करण्याचा समावेश आहे.

याशिवाय, ‘रेल मदद पोर्टल’द्वारे सार्वजनिक तक्रारींवरही लक्ष ठेवले जाते. हे तक्रारींचे रिअल-टाइम निवारण आणि प्रलंबित असलेल्या तक्रारींचे ऑनलाइन निरीक्षण आणि निपटारा प्रदान करते. विशेष मोहीम 2.0 अजूनही प्रगतीपथावर आहे आणि कार्यालयातील सर्व प्रलंबित बाबींची स्वच्छता आणि जलद निपटारा सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

– लेखन : जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments