महाराष्ट्र राज्यातील अंगदान व देहदान महासंघ सध्या पुढील उपक्रम राबवित आहे.
१) कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांचे समाज प्रबोधनाचे बळ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२) वर्षातून एकदा महाराष्ट्रातील सर्व संस्थांचे व कार्यकर्त्यांचे एकत्रित अधिवेशन घेऊन सर्वांच्या कार्यासाठी बळकटी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३) श्रेष्ठदान क्षेत्रात कार्य करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा साकल्याने व एकत्रितपणे विचार करून सरकार दरबारी अशा अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
४) समाज प्रबोधनासाठी विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
५) श्रेष्ठदान कार्यासाठी पूरक असे साहित्य प्रकाशित केले जात आहे.
नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान अशा श्रेष्ठदान क्षेत्रात अधिक सुसूत्रता, बळकटी येण्यासाठी असे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांना व कार्यकर्त्यांना
महासंघाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार व उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी आवाहन केले आहे की, कृपया त्यांनी आपली माहिती अंगदान व देहदान महासंघ (फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन) या संस्थेकडे पाठवावी.
या माहितीत संस्थेचे वा कार्यकर्त्याचे नाव, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, मेल आयडी, कार्यक्षेत्र व थोडक्यात परिचय या बाबी समाविष्ट असाव्यात.
ही माहिती संस्थेच्या मेल आयडीवर अथवा खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी.
ईमेल:
organdonationfed@gmail.com
व्हाट्सअप क्रमांक–
(i) श्री सुधीर बागाईतकर
उपाध्यक्ष
+919819970706
(ii) श्री प्रशांत पागनीस सहसचिव +918530085054
(iii) श्री शैलेश देशपांडे खजिनदार +919223580528
स्वयंसेवी संस्था अथवा वैयक्तिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास ते फेडरेशनचे सदस्यही होऊ शकतात.
सदस्यत्वाच्या माहितीसाठी त्यांनी विनंती केल्यास त्यांना सदस्यत्वाचा फॉर्म व इतर माहिती पाठविली जाईल, असे ही महासंघाच्या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800