परतीच्या पावसात
मन हेलावून गेले
अवनीच्या शृंगाराने
तृण ही डोलू लागले
फुला फुलांची आरास
सजली सुंदर धरा
गवताच्या तृणावर
दवबिंदू हा साजरा
नटलेली धरणीही
मनसोक्त भिजलेली
आनंदाने डोलणाऱ्या
फुलांमध्ये गंधाळली
मन धुंद करणारे
शरदाच्या चांद राती
शुभ्र धवल चांदणे
जसे शिंपल्यात मोती
चांदण्याचा पडे सडा
सैर करावी दोघानी
हात हातात घेऊन
रात येई मिलनाची
पौर्णिमेचा येता चंद्र
उजळली धरणी ही
रातराणीच्या गंधाने
काया ही दरवळली
चांद राती स्वप्नांच्या
दुनियेत निघे सखी
साज करून शृंगार
रंग ल्याली मोरपंखी
सुर सनईचे निघे
रात गंधाळून जाई
चंद्र असता साक्षीला
दोन जीव एक होई

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
मस्तच
खूपच सुंदर कविता!🌹✨👌