Sunday, July 13, 2025

काटे

मी चालता रस्त्यावरती
पसरल्या कुणी या पायघड्या
गुलाब पाकळ्या झाकती तयांना
काट्यासमवेत सुकल्या काड्या ।

बोचले काटे मृदु पायांना
उमगले आयुष्य सुमनांचे
काट्यांवरती डोलता डोलता
हसुन सहन किती करायचे ।

काट्यांवाचुनी नसे आयुष्य
खंत मनी का धरायची
चालतांना टोचणारच ते
काळजी फक्त घ्यायची |

नसे माहिती काट्यांनाही
वेदना होतात बोचतांना
हरखुनी जातात पण ते
फुलांना बघुनी हसताना |

स्थायीभाव तयांचा आहे
टोचणे हेची प्राक्तन आहे
करावा पाय घट्ट फुलांनी
काटा स्वागतास आतुर आहे

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले.
– संपादन : सौ अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

15 COMMENTS

  1. काट्या वाचुनी नसे आयुष्य, खंत मनी का धरायची
    चालतांना टोचनारच ते काळजी फक्त घ्यायची !
    किती सुंदर रचना, फार सुंदर, अप्रतिम 👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments