Sunday, July 13, 2025
Homeपर्यटनचलो, माथेरान...

चलो, माथेरान…

मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे, लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

माथेरान येथे जाण्यासाठी 100 वर्षांहून अधिक जुनी, भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक अशी नेरळ-माथेरान टॉय ट्रेन आहे.

सन 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वे युद्धपातळीवर या रेल्वे मार्गाची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे. नेरळ ते अमन लॉज पर्यंत पर्वतांना वळण देणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार होऊन 22 ऑक्टोबर पासून या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. या टॉय ट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून उदंड प्रतिसाद लाभत आहे.

दि. 22.10.2022 ते 30.10.2022 या कालावधीत, व्हिस्टाडोममध्ये 229, प्रथम श्रेणीतील 378 आणि द्वितीय श्रेणीतील 3,091 अशा एकूण 3,698 व्यक्तींनी प्रवास करून रु.4,84,141/- च्या महसूलाची नोंद केली आहे. यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतून रु. 1,49,995/- इतका महसूल समाविष्ट आहे जो एकूण रकमेच्या जवळपास 31% आहे.

मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा चालवते. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.

मध्य रेल्वे माथेरान हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय करत आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments