प्रख्यात साहित्यिक, अनुवादक, साहित्य अकादमीचे माजी प्रादेशिक सचिव आदरणीय श्री प्रकाश भातंब्रेकर यांच्या 75 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला.
हा कौतुकास्पद आनंद सोहळ्या म्हणजे समस्त साहित्य प्रेमींनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम होता, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या निमित्याने शब्दसृष्टीचे संपादक साहित्यिक प्रा.डाॅ. मनोहर यांनी संपादित केलेल्या श्री प्रकाश भातंब्रेकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन जेष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या गौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ.अनिल गायकवाड, प्रा.मुुकुंंद आंधळकर कार्यकारी संपादक सुु्श्री आशारानी, भटकळ, दिनकर गांगल, डाॅ.मनोहर यांची समयोचीत भाषणं झाली.
उत्सवमूूर्ती श्री.प्रकाश भातंब्रेकर यांचे कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले.
प्रथम मान्यवरांंच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. डाॅ. प्रतीची यांनी यावेळी ईश स्तवन सादर केले.
प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डाॅ.मनोहर यांनी केले. हा कार्यक्रम नीट नेेटका शिस्तबद्धतेने आयोजित करून तो यशस्वी करण्यात डाॅ.मनोहर यांचा सिंहाचा वाटा होता.
या सोहळ्यास साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव श्री.कृष्णा किंबहुने, पत्रकार रविप्रकाश कुलकर्णी, सुनील भातंब्रेकर, सौ.कमल भातंब्रेकर, डाॅ.प्रतीची भातंब्रेकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार रोपळेकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800