“गर्जे मराठी” हि अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थापन करण्यात आलेली स्वयंसेवी संस्था आहे. जगभरतील मराठी माणसे, ज्ञान, उच्चशिक्षण, उद्योजकता, आणि विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी एकत्र आणणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी, गर्जे मराठी संस्थेतर्फे
‘गर्जे मराठी अमृत’ हा अभूतपूर्व आणि महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम महाराष्ट्रातील नवउद्द्योजकांना निःशुल्क आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून प्रत्येकी कमीतकमी २ अश्या एकूण ७५ नवउद्द्योजकांना १८ आठवड्यांच्या मेन्टॉरिंग द्वारे शोध, निवड, पारख, पैलू पाडून कोंदणात बसवून स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची ताकद, “कल्पना ते गुंतवणूकदार” हि वाटचाल यशस्वी रित्या करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.
थोर शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या उपक्रमाची सुरवात ०१ जानेवारी २०२३ पासून होणार आहे.
Techonolgy, Business, Startup Ecosystem ह्या सारख्या विषयामध्ये तज्ज्ञ आणि जगप्रसिद्ध असलेले गर्जे मराठी सभासद मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि अत्यंत कार्यक्षम अश्या संस्था ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत.
ह्या संधीचा जास्तीतजास्त तरुण तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन गर्जे मराठी करीत आहे. १८ आठवडे, प्रत्येक रविवारी २ तासाच्या online mentoring program मध्ये भाग घेण्यासाठीचा अर्ज करण्यासाठी संपर्क करावा. आनंद गानू garjemarathi@gmail.com
WhatsApp 001 7327897130
Application form: http://bit.ly/GMG_Amrut_application_form
– टीम एनएसटी. ☎️+919869484800