Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यगझल : वार

गझल : वार

काळजावर वार झाले
दु:ख आता फार झाले

सांत्वनाचे शब्द त्यांचे
काळजाला भार झाले

कोंडमारा हा मनाचा
पेटता अंगार झाले

वेदनांनी झेलले जे
ते फुलांचे हार झाले

दु:ख माझे टांगणीला
कंटकांचे वार झाले

स्वप्न पाहिले सुखाचे
जीवनी साकार झाले

पेललेले डाव सारे
वेदनेच्या पार झाले

पल्लवी उमरे

– रचना : पल्लवी उमरे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments