Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यस्त्री म्हणुन जगणं...

स्त्री म्हणुन जगणं…

स्त्री म्हणुन जगणं
इतक सोप असतं का ?
स्त्री म्हणुन जगणं
प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात
अश्रु पापणी आड दडवणं ॥ धृ ॥

इथे बसु नको, याच्याशी बोलु नको
दारात उभे राहु नको
मोकळ्या हवेत, मुग्ध श्वासही घेऊ नको
की व्यक्तही करू नको
तुझे आवडणं नावडणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणून जगणं ॥ १ ॥

शाळा असो की कॉलेज
तु अव्वल असायलाच पाहिजे
नुसता अभ्यासच नाही
घरकामही करायलाच पाहिजे
स्पोर्टस अन् कराटे नको गं बाई
महत्त्वाचे तुझे मोहक दिसणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं ॥ २ ॥

उशिरापर्यंत अभ्यास करण्या
नसे कधीच मनाई
लवकर उठुन चहा करण्यास
कर सदा तुच घाई
नाही स्वीकारणार कुणीच
तुझे उशीरापर्यंत झोपणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं ॥ 3 ॥

नोकरी करण्यास
मुळीच कुणाची ना नाही
घरकामाकडे दुर्लक्ष
मुळीच सहन करणार नाही
आवश्यकच आहे तुला
ओला टॉवेल अन् पसारा उचलणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं ॥ ४ ॥

उदरी जन्मल्या फक्त मुलीच
याला फक्त तुच दोषी
नाही जन्मला पुत्र म्हणुन
व्यर्थ ते रामेश्वर अन् काशी
साहवत नाही आता
मुलगी परक्याचे धन म्हणवुन घेणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं ॥ ५ ॥

आदर्श आहेत तुम्हाला
सुनीता विल्यम्स् अन् कल्पना चावला
सॅल्युटही करतात अन्
आदरार्थी ठरतात वीरबाला
पण गुन्हयास पात्र तुझे
घराबाहेर पाऊल ठेवणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं ॥ ६ ॥

पिता असो की बंधु,
पती असो की पुत्र
दयायचे सदैव त्यांना
आपले जगण्याचे सुत्र
किती कठीण ते उदर फोडुनी
पुरुषांना जन्म देऊन समाधानाने हसणं
अन् नंतर कळसुत्री बाहुलीप्रमाणे
त्यांच्याच इशार्‍यावर नाचणं
इतकं सोपं असतं का
स्त्री म्हणुन जगणं
प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणात
अश्रु पापणीआड दडवणं ॥ ७ ॥

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

30 COMMENTS

  1. स्त्री जीवनातील वास्तव खुप छान शब्दात मांडले आहे ताई 👍

  2. स्त्री दुःखाचे वास्तव छान व्यक्त केले आहे सुजाता.

  3. खुप सुंदर कविता केली माई अशीच प्रगती करत रहा

  4. सुजाता सुंदर रचना स्त्रीचे सुंदर वास्तव मांडलय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments