अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरच्या 18 व्या वार्षिक परिषदेचे, “नॅपकॉन 2022” चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन भुसारी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या 3 दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी कार्यशाळा झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी झालेल्या शैक्षणिक सत्रात अनेक वैज्ञानिक विवेचन प्रस्तुत करण्यात आलेत.
मूलभूत गोष्टींपासून ते प्रगत (ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट) आणि काळजी या विषयांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील विविध शहरांतील दिग्गज तसेच विदर्भातील 200 हून अधिक बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.
या वर्षी बालरोगशास्त्र अकादमी, नागपूर येथे प्रथमच दोन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. यावेळी जीवन गौरव पुरस्कार डॉ. एम एस रावत, माजी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, बालरोग विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांना बालरोग क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी प्रदान करण्यात आला.
डॉ डी एस राऊत माजी प्राध्यापक आणि बालरोग विभागाचे प्रमुख आणि नागपुरातील ज्येष्ठ बालरोगतज्ञ यांना महाराष्ट्र आयुर्विज्ञान (एमयूएचएस) विद्यापीठा कडून “तीव्र स्वादुपिंडाचा दाह” वर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तसेच पीएचडी मिळाल्या बद्दल “व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच शैक्षणिक आणि खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बालरोगतज्ञांचाही यावेळी प्रथमच सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रदीप सुर्यवंशी, प्राध्यापक. आणि प्रमुख, निओनॅटोलॉजी विभाग यांच्या हस्ते प्रतिष्ठित
कै. डॉ. डी जी गान स्मृती व्याख्यान मालेत बीव्हीयू मेडिकल कॉलेज, पुणे यांनी “भारतीय नवजात रक्तविज्ञान आणि पोकस – संशोधन, प्रशिक्षण” या विषयावर भाषण केले.
पुढील अध्यक्ष निवडून आलेले डॉ. संजय पाखमोडे यांच्याकडे मशाल सुपूर्द करून परिषदेची सांगता झाली.
डॉ.उदय बोधनकर संरक्षक, डॉ. राजकुमार किरतकर, आयोजन अध्यक्ष व अध्यक्ष बालरोग अकादमी नागपूर.
डॉ प्रितेश खटवार, संघटन सचिव व मानद सचिव एओपी नागपूर
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800