मौलाना अबुल कलाम आझाद यांनी, भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ असे प्रदीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या गौरवार्थ, भारत सरकार २००८ सालापासून त्यांचा ११ नोव्हेंबर हा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करीत असते. या निमित्ताने शिक्षणाचे महत्व सांगणारा हा विशेष लेख……
– संपादक
“राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या, सर्व परम आदरणीय गुरुवर्यास शत: शत: वंदन व आपणा सर्वांस सद्हृदयस्थ शुभेच्छा.
विद्या ददाति विनयम् –
विनयाद् याति पात्रताम् |
पात्रत्वात् धनमान्पोति –
धनात् स्व:धर्मस्य –
तत: परम् सुखम् ||
कोणतीही विद्या ग्रहण केल्याने विनय, विनयातून बौध्दिक पात्रता, पात्रतेतून धन, धनातून स्व:धर्म आणि स्व:धर्मातूनच परम सुख प्राप्त होते. अनादि काळा पासून आपल्या आचार्यश्री, ऋषी मुनिनीं आपल्या अमोघ दिव्य वाणीतून शिक्षणाच्या दिव्यत्वाची प्रचिती दिली आहे. तेव्हा पासूनच खरी “गुरु – शिष्य” परंपरा हिच आपल्या सार्थकी जीवनाची महा कल्याणकारी अशी सुसंस्कारीत संस्कृती बनली आहे.
आपल्या जोश पूर्ण जीवनाचे “शिक्षण” हेच मूळ माध्यम स्तोत्र आहे म्हणूनच …
एक एक क्षण देखिल वाया न घालविता, अनेक शास्त्रांच्या सारातून विद्या प्राप्त केली पाहिजे.ज्यांच्या कडे कोणतीही विद्या वा कलाच नाही, त्यांची अवस्था अगदी शेपूट तुटलेल्या प्राण्यासारखीच असते. न अंगावर बसलेल्या माशा झटकता येत ना धड आपला पार्श्व भाग झाकताही येत नाही !
“सा विद्या या विमुक्तयै”
अनेक अनेक बंधनातून मुक्त करणाऱ्या “सुविद्य शिक्षणा” मुळेच मानवास दैदिप्यमान असे कोणते ही परमोच्च यशो शिखर सहज पणे गाठता येते, अन्यथा..
विद्ये विना मती गेली –
मती विना निती गेली –
निती विना गती गेली –
गती विना वित्त गेले …
शेवटी …हाती धोपटणे राहिले…
असे कोणत्याही प्रकारच्या “शिक्षणा” विना आपले वा इतर कोणाचे ही जीवन माती मोल होवूच नये एवढी काळजी आपण सर्वच जण मिळून घेवू यात …
जेथे दिव्यत्वाची प्रचिति –
तेथे कर माझे जुळती …

– लेखन : विमलकुमार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800