‘दोस्ती’
राही मनवा दुख की चिंता, मेरा तो जो भी कदम है, चाहूंगा मै तुझे सांज सवेरे, कोई जब राह न पाये, जानेवालो जरा मुडकर, गुडिया हमसे रुठी रहोगी अशा लोकप्रिय गीत संगीताचा समावेश असलेल्या राजश्री प्राॅडक्सन्सच्या ‘दोस्ती’ (रिलीज ६ नोव्हेंबर १९६४) च्या प्रदर्शनास यशस्वी ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ताराचंद बडजात्या निर्मित आणि सत्येन बोस दिग्दर्शित ‘दोस्ती’ या चित्रपटातील गाणी मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिली होती. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं सुमधुर संगीत त्या गाण्यांना लाभलं. अपघातात पाय गमावलेला रामू (सुशीलकुमार) आणि बालपणीच दृष्टी गमावलेला मोहन (सुधीरकुमार) यांच्या अनोख्या दोस्तीची कहाणी या चित्रपटात दाखवली आहे.
या चित्रपटाला फिल्म फेअरचे- उत्कृष्ट चित्रपट,
उत्कृष्ट कथा (बाणभट),
उत्कृष्ट संवाद लेखन (गोविंद मुनीस),
उत्कृष्ट संगीतकार (लक्ष्मीकांत प्यारेलाल),
उत्कृष्ट पार्श्व गायक (महमद रफी),
उत्कृष्ट गीतकार (मजरूह सुलतानपूरी)
असे सहा पुरस्कार मिळाले. या चित्रपटात सुधीरकुमार सावंत, सुशीलकुमार शर्मा, संजय खान, लीला मिश्रा, नाना पळशीकर, लीला चिटणीस, अभी भट्टाचार्य, बेबी फरीदा, उमा आणि जोनी व्हिस्की यांच्या भूमिका होत्या.
या चित्रपटातूनच संजय खान आणि मराठी अभिनेत्री उमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
मैत्रीवरचा अतिशय आदर्श चित्रपट म्हणून कायमच या चित्रपटाचा उल्लेख होतो. लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडून आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

– लेखन : दिलीप ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹दोस्ती हा चित्रपट अजरामर आहे. आजही सुमधुर गाणं लागलं तरीही मन हळव होतं. 🙏🙏🌹