विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची काव्यरुपी व्यथा..
शब्दालंकार
नोकरी झाली दहा वर्षे
पगाराचा पत्ता नाही,
डोईवर छत मिळेल
इतुकी आमुची मालमत्ता नाही
नाही शिकवले आम्ही अशी
एकही इयत्ता नाही
विद्यार्थी आमुचे चमकतात
कोण म्हणेल गुणवत्ता नाही ?
भेळ भत्ता घ्यायलाही
मिळालेला भत्ता नाही
सण वा समारंभ
घरादारात सुबत्ता नाही,
पोट भरू शकेल इतुकी
काय आमुची विद्वत्ता नाही ?
खडू लेखणी शस्त्रे आमुची
म्हणून हाती कत्ता नाही,
न्याय देईल आम्हाला
काय अशी सत्ता नाही ?
सांगावे सांगा कितीदा
सारे काही अलबत्ता नाही..

– रचना : दीपक महाले. शिरूर कासार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
