अवयवदान जागृती साठी नांदेड शहरात नुकतीच भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका तसेच धरती नर्सिंग कॉलेज च्या प्रचारिका, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीच्या प्रारंभी अवयवदार प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर रवी सरोदे, नेत्र चिकित्सक डॉक्टर चंदनकर, आर एम ओ डॉक्टर साखरे, श्रीमती ज्योती पिंपळे, डॉक्टर श्रीमती रोशन तडवी, प्राचार्य रेणुकादास, श्रीमती अरुणा शुक्ला, प्राध्यापक आर के भुलेश्वर, उप प्राचार्य लक्ष्मणराव शिंदे, श्रीमती श्रीमती धरती महाजन, सेवानिवृत्त आदिवासी उपायुक्त विजय वरवंटकर, प्रकाश भाऊ राठोड, सुनील लोणे, भीमराव तरटे, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, दशरथ माळी, सायन्स कॉलेज, कॉलेज, डेंटल कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर रॅली महात्मा फुले पुतळा येथून निघाली. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी डॉक्टर चंदनकर सर, चंपतराव डाकोरे पाटील आणि रॅलीचे संयोजक, ज्येष्ठ पत्रकार माधव अटकरे यांनी अवयवदानाचे महत्त्व आणि गरज यावर महत्त्वपूर्ण विवेचन केले. उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्याचे समर्थन केले.
यावेळी दिव्यांग संघटनेचे चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी अवयवदान जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
शासकीय रुग्णालयाचा पूर्ण स्टाफ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित होता.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
