Friday, December 26, 2025
Homeलेखएड्स : एचआयव्हीसह एकता !

एड्स : एचआयव्हीसह एकता !

उद्या, 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष लेख…
जगाला आजपावतो अनेक रोग, विषाणूजन्य आजारांचा सामना करावा लागला आणि करावा लागत आहे.

सुदैवाने क्षयरोग, कुष्ठरोग, पोलिओ अशा अनेक रोगांना प्रतिबंध शास्त्रज्ञांना यश आले आहे. आणि त्यांच्या नियोजनपूर्वक वापरामुळे या रोगांना अटकाव घालण्यात मानव यशस्वी ठरला आहे. पण दुर्दैवाने अजूनही एड्स प्रतिबंधक लस शोधता आलेली नाही. त्यामुळेच मुळात एड्स होऊच नये, अशी जीवन पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे.

भारतात 1986 साली चेन्नई येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा रोग म्हणून “एड्सची” लोकांना ओळख झाली. जेंव्हा “एड्स” या आजाराची ओळख झाली तेव्हा जगात कितीतरी लोकांना एचआयव्ही/ एड्सची लागण झाली होती. कितीतरी लोक आजाराला बळी पडले होते.

ह्यूमन इम्युनोडीफीशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) अर्थात मानवाच्या प्रतिकारशक्तीला नष्ट करणारा विषाणू म्हणजे एचआयव्ही.

एड्स हे अक्वायर्ड इम्युनो डीफीशियन्सी सिंड्रोमचे लघुनाम. एखादा विशिष्ट रोग दर्शविणा-या तक्रारी किंवा चिन्हे रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरात असलेल्या यंत्रणेला नाकाम करुन एचआयव्ही आपल्या शरीरावर हल्ला करतो. कालांतराने, ही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते आणि रोगांचा सामना करण्याची नैसर्गिक क्षमता शरीर हरवून बसते. अशा वेळेला त्या संक्रमित व्यक्तीला विविध रोग होतात.

एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर, सतत ताप, वजनात घट, जुलाब इ. या सर्व गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच चाललेली होती.

एच आय व्ही/एड्स या आजारावर कोणतीही प्रतिबंधात्मक लस अथवा प्रभावी औषध नाही, त्यामुळे प्रतिबंध हाच एकमेव मुख्य उपचार ठरतो. यासाठी निरोधचा वापर करावा असे शासनातर्फे जनजागृतीपर नेहमीच सांगितले जाते. अधिक माहिती साठी हेल्पलाईन नं.1097 सुरू करण्यात आली आहे.

एड्सला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन व शासनाच्या विविध यंत्रणा जन जागृती करण्यासह विविध उपाय योजना करीत आहेत. या उपाय योजना पुढील प्रमाणे आहेत.

१) एचआयव्ही चाचणीसाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, धर्मदाय रुग्णालय इ. आदी ठिकाणी एचआयव्ही समुपदेशन व चाचणी मोफत केली जाते.

२) आयसीटीसी -01,आयसीटीसी- यामध्ये ऐच्छिक एचआयव्ही चाचणी केली जाते.

३) आयसीटीसी-01- गरोदर माता यांची एचआयव्ही चाचणी केली जाते.

४) गुप्तरोग व प्रतिबंध उपचार-लैगिक समस्या असल्यास एचआयव्ही चाचणी, रक्तकेंद्र,- रक्तदान शिबिरात संकलन झालेले रक्ताची एचआयव्ही चाचणी केली जाते.

५) मोबाईल आयसीटीसी
मालगाडी (ट्रक ड्रायव्हर) वाहक, क्लिनर, कारागृहातील आरोपी, बार बाला, हाँटेल कामगार, घरेलू कामगार तसेच गावातून स्थलांतरित लोक, तसेच एनजीओ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते. जर या चाचणीत कुणी पाँझिटिव्ह आढळल्यास त्यास पुढील उपचारासाठी अँन्टिरिट्रोव्हायरल थेरपी पध्दतीने (ए.आर.टी.) उपचार केले जाते.

६) अ‍ॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी म्हणजे एच.आय.व्ही विषाणूचे प्रमाण कमी करण्यास मदत होणे. पण आजाराचे समूळ उच्चाटन होत नाही.
एखादया व्यक्तीस एच. आय. व्ही.ची बाधा झाल्यास जवळच्या मान्यता प्राप्त ए.आर.टी केंद्रात जाऊन डॉक्टांच्या सल्ल्यानूसार उपचार सुरु करण्यात येते. शासनस्तरावर या सर्व सुविधा मोफत आहे.

शासन जरी विविध उपाय योजना करीत आहे, तरी आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. पुरुष हाच प्रामुख्याने कुटूंबाचा कणा असतो. त्यामुळे त्याला एच.आय.व्ही/एड्स या आजाराची लागण झाल्यावर त्याच्या कुटूंबावर पडणारा मानसिक, सामाजिक आर्थिक ताण यामुळे कुटूंबाची स्थिती खालवली जाते. यासाठी समुपदेशन महत्वाचे ठरते.

लग्न करतांना पत्रिका पाहण्याबरोबर एचआयव्ही चाचणी जर करून घेतली तर युवा पिढी पुढील आयुष्य चांगले जगू शकेल. हे आजच्या पिढीने समजुन घेतले पाहिजे. यासाठी महाविद्यालयात रेडरिबन क्लब स्थापन करून एचआयव्ही एड्स विषयी युवा वर्गात समुपदेशन करून जनजागृती केली जावी.
एचआयव्ही जनजागृतीपर समाजाने सामाजिक बांधिलकी ठेऊन “आपली एकता, आपली समानता, एचआयव्ही सह जगणाऱ्याकरिता” कलंक आणि भेदभाव, न करता पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे कसे जगता येईल यासाठी समाज तसेच युवा पिढीने पुढाकार घेणे निश्चितच आवश्यक आहे.

हेमकांत सोनार

– लेखन : हेमकांत सोनार.
तंत्रद्य, रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”