Saturday, March 15, 2025
Homeबातम्यास्वच्छता : अभिनव उपक्रम

स्वच्छता : अभिनव उपक्रम

जळगाव शहरात दर रविवारी एक अभिनव स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.

येथील युवक युवतींचा सहभाग असलेला प्लाॅगर ग्रुप आणि सामाजिक कार्यकर्ते, मदन लाठी जळगाव शहरात दर रविवारी एकेक भाग, रस्ता घेऊन दिड दोन तास स्वच्छता मोहीम हाती घेतात.

गेल्या दहा महिन्यापासून ही मोहीम नियमित सुरू आहे. आतापर्यंत मेहरून शिवार, मेहरून गार्डन, स्टेशन रोड, स्टेडियम रोड आणि इतर काही ठिकाणी मोहीम राबविण्यात आली आहे.
त्यानुसार रविवारी सकाळी ७ वाजता नेहरू चौक ते टॉवर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यभागी जे प्लास्टिक होते ते गोळा करण्यात आले. या मोहिमेची सांगता टॉवर येथे झाली.

टॉवर जवळील काही दुकानदारांनी तसेच चहावाले आणि पोहेवाले यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचा सांगितले. सिटी पोलीस स्टेशन मधील एक अधिकारी यांनी पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचा सांगितले.

या स्वच्छता मोहिमेचे महत्त्व ओळखून जनतेने आणि महानगरपालिकेने अधिक सहकार्य केले तर या स्वच्छता मोहिमेला वेग येऊ शकेल आणि शहर स्वच्छ, सुंदर दिसण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य जपण्यास मदत होईल, अशी सार्थ अपेक्षा श्री मदन लाठी यांनी व्यक्त केली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. आदरणीय श्री भुजबळ सरांनी आमचा स्वच्छ अभियानाचा उपक़म वाचकांपुढे प़काशीत केला त्याबद्दल आमच्या सर्वांकडून खुप खुप धन्यवाद आणि आपले आभारी आहोत
    जनतेपर्यंत अशे उपक़म पोचविण्याचे आणि जनजागृती चे सोशल मेडीया हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. आणि आपले सहकार्य फार महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments