भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या महापरीनिर्वाणदिनी, ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर येताना किंवा अन्य ठिकाणी महामानवाला अभिवादन करताना वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करून आदरांजली वहावी असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर प्रवास करीत आपले शिक्षण घेतले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते विद्यार्थीच होते.उच्च व सर्वाधिक शिक्षणामुळे ते देशाचे मजूर मंत्री, कायदा मंत्री व संविधान निर्माते होऊ शकले. समाजाला त्यांनी शिका हा शैक्षणिक संदेश दिला. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक संदेश अंमलात आणण्यासाठी सर्वांनी वह्या, पेन, पुस्तके व ईतर शैक्षणिक साहित्य अर्पण करून महामानवाला ख-या अर्थाने आदरांजली वहावी असे आवाहन भीमराव आंबेडकर यांनी केली.
महामानव प्रतिष्ठान एक वही एक पेन अभियानचे प्रवर्तक पत्रकार राजू झनके यांनी मागील सात वर्षा पासून महामानवाला “वह्या पेनांची आदरांजली” हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमांतर्गत समाजातील हजारो गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम केलेले असून येत्या ६ डिसेंबर रोजी देखील दादर चैत्यभूमी सह राज्यात ठिक ठिकाणी एक वही एक पेन अभियान राबवून जमा साहित्याचे गरजूंना वितरण करावे असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आपण श्री राजू झनके यांच्याशी त्यांच्या 9372343108 या मोबाईल नंबर वर संपर्क साधू शकता.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आपण एक वही एक पेन दिल्यामुळे जर देशातील शिक्षणाची गाडी पुढे जात असेल तर खरच आपल्याला हे काही जड नाही. सुरुवात करायलाच हवी.
हा मानव प्रतिष्ठान चा एक वही एक पेन उपक्रम स्तुत्य आहे.