४) चर्म-: या प्रकारात चामड्याच्या वस्तूंचा समावेश होतो.
त्या पुढील प्रमाणे आहेत.
१) श्रीचरणाखाली ठेवण्याची गादी, २) पाटावर ठेवण्याची गादी, ३) वोसाडी, ४) पालखीवर घालण्याचे आच्छादन, ५) पाखाल, ६) पोहरा, ७) काको नावाच्या भक्ताचा करवता, ८) सागळ, ९) उपान्हौ.
५) धातू:- या प्रकारात सोने, चांदी, तांबे, लोखंड यांच्या वस्तूंचा समावेश होतो.
त्या पुढील प्रमाणे आहेत. १) वांकी, २) सांखळे, ३) कांबी, ४) पालमांडे, ५) आरतीचे तबक, ६) थाळा, ७) ताट, ८) वाटे, ९) वाटी, १०) आरसा, ११) आडकित्ता,
१२) कढई, १३) गंगाळे, १४) ताम्हण, १५) दोन तांब्याचे कळस, १६) अचलपूर येथील अंबिनाथ लिंगावरील तांब्याच्या पत्रा, १७) देऊळवाडा येथील तांबे, १८) चौरंगाचे लोह, १९) राज- मठाच्या कवाडाचे लोह, २०) काकोच्या करवत्यांचे लोह, २१) महाद्वाराच्या कवाडाचे लोह, २२) केशवनायकांच्या पाणपोईच्या तोटीचे लोह, २३) तसेच कवाडाचे लोह.
६) दात:- या प्रकारात हस्तीदंता पासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. ती पुढील प्रमाणे आहेत.
१) कापुराची सेंद, २) फणी, ३) करंडा.
७) काष्ट -: या प्रकारात लाकडांपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. ती पुढील प्रमाणे आहेत…
१) आऊसाचे पात्र, २) डोमेग्रामच्या राजमठाचा खांब,
३) आणि उंबरवट, ४) नवामाचा, ५) जुना माचा, ६) माचोळी, ७) पाट, ८) चौरंग, ९) रिद्धपूर येथील राजमठाचे दरवाजे, १०) भानवसीचे कवाड, ११) स्त्री-पुरुषाच्या मठाचे कवाड, १२) केशवनायकाच्या माळवधाचे कवाड, १३) शाळेचे कवाड, १४) बारव केशवीचे कवाड, १५) नेवरगावचे बाळाने, १६) फणी
१७) डोमेग्रामचे दोन्ही यमळार्जुन.
८) पाषाण :- या प्रकारात कळ्या दगडी पाषाणांचा समावेश होतो.
१) मोत्याचा टिळा यांचा समावेश पाषाण जातीत केलेला आहे, २) सिंहनस्थळी, ३) महाद्वाराचा उंबरवट, ४) सोपान पायरी, ५) सोपान भिंत, ६) राजमठाचा उंबरवट, ८) रिद्धपूर येथील राज मठातील आरोगगयनास्थानीचा खांब.
रिद्धपूरचे बारा घोडे गुडा खडकी विचार चिरा उखळी कर्दम प्रसाद जळालेल्या वस्त्रप्रसादांच्या राखेचे पुठ्ठ्यावर लेप देऊन जे प्रसाद तयार केले जातात त्यास कर्दम प्रसाद असे म्हणतात हा प्रकार नंतरच्या काळात अस्तित्वात आलेला आहे.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800