वृत्त—पादाकुलक
(८+८ मात्रा)
चौथा स्तंभच लोकशाहिचा
डळमळीत हा झाला खंदा
नफ्यातोट्यात गणित अडकले
उरला नुसता धोपट धंदा
अभिव्यक्ती ही स्वातंत्र्याची
स्वैराचारी ना मर्यादा
नंगानाचच आक्रस्ताळी
अहमहमिकेत धुंडि फायदा
मूळ विषयाचि ती गळचेपी
असत्याचाच असे भडिमार
भयग्रस्ततेत संधी शोधी
दाहक वास्तव दर्शन सुमार
सुळसुळाट हा लोकमाध्यमी
दूरदर्शनी वृत्तपत्रीही
पक्षपात ती वितरण करती
स्वये विक्रती छंदिफंदिही
सत्यदर्शनी परखडवादी
लोकहितवादि जो जन्म खरा
स्वरूप जाता स्वार्थापोटी
विरुपा झाकी छद्मी नखरा
आवर आता सावर थोडे
घोडे काबुत धरी वास्तवा
लोकाग्रणी तु लोकरंजनी
प्राप्त करी तू सुगतवैभवा

– रचना : हेमंत कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800