राग हेमंत
राग हेमंत हा अतिशय मधुर राग आहे. राग कौशिक – ध्वनीमध्ये जेव्हा पंचम आणि ऋषभचा वापर अवरोहमध्ये केला जातो, तेव्हा राग हेमंत तयार होतो.
थंडीचे दिवस म्हणजे हेमंत ऋतु असे समजले जाते आणि हेमंत ऋतूत खास वेगवेगळे राग गायले जातात. हेमंत हा राग सहसा गायला जात नाही. गायक दिनकर कैकिणी हा राग फार सुंदर रित्या गात असत. हेमंत हा राग वादकांचा आहे, असे मानले जाते. या रागाची निर्मिती ही महान वादक अल्लाउद्दीन खानसाहेब यांनी केली आहे. मैहर घराण्याचे संस्थापक आणि रविशंकर यांचे गुरु म्हणून ते जगाला ज्ञात आहेत. असे अमरेंद्र धनेश्वर यांनी त्यांच्या लेखामध्ये आवर्जून उल्लेख केला आहे.
हेमंत (हिवाळा ऋतु)- सारंगदेवाच्या भिन्न षड्ज वरील श्लोकात अंतर्भूत आहे:- ‘ब्रह्माला त्याचे प्रमुख दैवत असल्याने, सार्वत्रिक उत्सवाच्या प्रसंगी हिवाळ्यात (हेमंत ऋतु) दहशत (भयनका) आणि घृणा व्यक्त करण्यासाठी हे गायले जाते. (बिभत्स)’.
हा राग एक स्निग्ध, खोल आणि सुखदायक वातावरण तयार करतो. राग हेमंत हा तीनही सप्तकांमध्ये मुक्तपणे विस्तारता येऊ शकतो.
या रागात ऋषभ हा थेट वापरला जातो जसे ग रे सा, पण पंचम स्वराचा वापर कमी आहे. आणि तो मींड किंवा कण स्वरा सारखा वापरला आहे.
हेमंत हा एक मध्यप्रधान राग आहे.
राग हेमंत हा साधारणपणे संध्याकाळच्या मैफिलींमध्ये, सूर्यास्तानंतर सादर केला जातो.
थाट : बिलावल
जाति : औधव – संपूर्ण
वेळ : रात्रीचा दुसरा प्रहार (रात्री 9 ते रात्री 12)
हेमंत रागातील मराठी आणि हिंदी गाणी
1) तुम बिन जीवन कैसा जीवन – चित्रपट – बावर्ची
२) बलमा अनाड़ी मन भाये – चित्रपट – बहुराणी
3) सुध बिसर गयी आज – चित्रपट – संगीत सम्राट तानसेन
4) रूठ के तुम तो चल दिए – जलती निशानी
5) उड जा रे कागा – मीरा भजन

– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800