नमस्कार मंडळी.
‘वाचक लिहितात ‘ या सदरात आपले स्वागत आहे.
“डॉक्टर, तुम्ही सुध्दा !”
या सौ स्मिता भागवत, कॅनडा यांनी स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या लेखाला छान प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. काही या आधी दिल्या आहेत.काही आता देत आहे.
इतिहास प्रेमी,गोड स्वभावाचे अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेले श्री श्रीपाद नांदेडकर यांच्या “माहिती”तील आठवणी ” संस्मरणीय अशाच आहेत.
तसेच “माझी पत्नी: माझा अभिमान” या श्री किरण वनगुजर यांनी लिहिलेल्या आणि जनसेवक जयश्री किवळेकर यांच्या यश कथाना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळत आहे. या दोघांचे हार्दिक अभिनंदन.
या व इतर लेखनाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
डॉक्टर, तुम्ही सुध्दा !
या वरील प्रतिक्रिया….
अंधाऱ्या रात्रीचा तो प्रवास आणि अँब्युलन्स साठी केलेला मानवतेचा थरार. क्षणभर मन स्तब्ध झाले. सुखरुप निभावलात त्यातून. ढाबेवाला मात्र मनात घर करुन गेला. त्याने त्याचे करारीपण जपले.
“डाॅक्टर मंडळी मात्र नाव मोठं लक्षण खोटं” पठडीतली वाटली. पण त्यांनाही शेरास सव्वाशेर भेटलाच याचा आनंद झाला.
– मीना मोकाटे.
खरंच,
“डॅाक्टर तुम्ही सुध्दा ?” असं विचारायला लागावं, असेच सध्या दिवस आले आहेत. तुमचा हा अनुभवही त्यातलाच !
सर्वत्रच असे घडतांना दिसते पण काही कार्यक्षेत्रात असं घडणे अजिबात अपेक्षित नाही, उलट ते चुकीचेच आहे.
संस्कारातले, सरकारचे, समाजातले नियम धरून जो चालतो त्यालाच हे सर्व खटकते, तो हे पाहून अस्वस्थ होतो. पण चुकीचे वागणाऱ्या या डॅाक्टरांसारख्या, काही सुशिक्षीत लोकांना त्याचे काही वाटत नाही.
ढाबा मालकासारखे मूठभर लोकं आहेत, ज्यांना ह्याची जाणिव आहे, म्हणूनच हे जग अजून चालू आहे !
– चित्रा मेहेंदळे. पार्ले, मुंबई.
With very appropriate words nicely written story. People normally learn with an experience so very good example has been set up. I would like to read more stories from you, in fact would like to learn an essence of the life. Thank you very much.
– Ujjvala Tambvekar. New Jersey, America
खूप सुंदर आणि उद्बोधक कथा तर आहेच, शिवाय तुमच्या चुरचुरीत शैलीत वाचण्यात मजा पण येते.
तुम्ही जी परिस्थिती मांडली आहे, ती वास्तविक आहे, आणि त्या ढाबा वाल्याने दिलेला धडा हा हायवे वरच्या ढाब्यांवरच मिळू शकतो असे मला वाटते.
रामदेवांच्या चतुरपणाच्या काही कथा ऐकल्या त्यात ही नव्हती. पण सेवा करणाऱ्या साधकांना असे प्रसंग नेहमीच अनुभवायला मिळतात. याबद्दल कुणी तरी आमच्या गुरूला प्रश्न केला होता, “तुम्ही सगळ्यांचाच स्वीकार करता. म्हणून चोर आणि समाजकंटक तुमच्या चांगुलपणाचा गैर फायदा घेतात. They use you!”
गुरुदेव हसत म्हणाले, “Oh, so nice! I am useful to them too!”😊
– मिलिंद केळकर. पुणे
नमस्कार.
मधुमेहावर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. इतक्या मोठ्या प्रमाणात मधुमेह हे माहीत नव्हते. डॉक्टर अच्युत बन यांनी छान माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच स्वतःची काळजी घेवू, धन्यवाद.
स्वातीताईंचे “आठवणीतील चाचा नेहरु” हे ही खूप भावले. अश्या पुस्तकालयाची नी कौतुकालयाची आज खरी गरज आहे. लहान मुलं एकटी पडली आहेत.
प्रा.विसुभाऊ बापट सर यांचे कुटूंब रंगलंय काव्यात हे सदर नेहमीच अफलातून असते. ए. के .शेख यांचे कार्य खरेच महान आहे.
पुस्तक परिचय मधील “नर्मदायन” पुस्तक पण छान वाटले.
संगीता कासार यांची “साद” कविता ही खूप सुंदर आहे.
देवेंद्र सर नी अलकाताई आपल्या पोर्टलवर भेटलेली सर्व माणसं ही तुमच्या दोघांचा जणू वसाच चालवीत आहेत.
प्रत्येकाला स्वतः एकटे पुढे जायचे नाही तर सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे.
या सर्वांबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻
– कवयित्री आशा दळवी, दुधेबावी, सातारा
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यिक जीवन प्रवास सुरेख पद्धतीने उलगडला आहे. खरोखरच वाचनीय.
– राधिका भांडारकर. पुणे
आदरणीय मधुभाईंवर अतिशय समरसून आणि सुर्हदयतेने लिहिले आहे. दिलीपजी अभिनंदन !
– प्रा डॉ अजित मकदुम. नवी मुंबई.
सागराच्या लाटासोबत
स्वप्नांची सजावी माळ
चिंब चिंब होत तुषारांनी
रम्य व्हावी संध्याकाळ..
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची माहिती आवडली. बरीच माहिती नसलेल्या गोष्टी समजल्या. त्या प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद. आपल्या विभागात ते सहाय्यक संचालक असताना नागपूर अधिवेशनात कर्णिकांची भेट झाली होती.
– सुधाकर धारव.
निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ
मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील लेख आवडला… करूळ चा मुलगा ..पासून सर्व पुस्तके आहेत माझ्याकडे ..आमचे ही अभिनंदन
मोबाईलवर सहज हाताळता येणारे हे एप्स खरेच खूप भयावह आहेत. 10 वर्षांचा मुलगा देखील आता असे प्रश्न विचारू लागला आहे ..भविष्यात पॉर्न चे दुष्परिणाम नक्कीच अनियंत्रित होणार असे भय वाटते आहे ..किंवा झालेच आहेत
लालबत्ती मध्ये मुलांची जपणूक होतेय ..निकाल छान लागलाय हे वाचताना बरे वाटते
परवीनजींची कविता छान आहे.
– स्वाती वर्तक. मुंबई
एक संध्याकाळ..
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
सौ मनीषा पाटील. केरळ.
🕉️श्रीपाद नांदेडकरांचा लेख आवडला. रायगडावर राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमावरील लेख व लेखिका व गायिका योगिनी जोगळेकरांवरच्या प्रसंगातील भुमिका उद्बोधक वाटली. धन्यवाद..
– सु ह तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
श्रीपाद नांदेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. तो मुळात एक संवेदनशील माणूस. जबाबदार लेखक. इतिहासाचा जाणकार अभ्यासक. भरभरून बोलणारा वक्ता. जीवनाचा एक रसिक उपासक. त्यांची स्मरणशक्ती किती लखलखीत आहे हे वरील लेखातून दिसून येते. असेच लिहित रहा; खूप खूप शुभेच्छा. 👍
– प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक. मुंबई.
श्रीपाद नांदेडकर यांची आठवण आवडली. त्यांनी सोन्याच्या गणेश मुखाबद्दल लिहावे.. सर्वांना वाचनीय असा इतिहास आहे…
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ.
श्री.देवेंद्र जी भुजबळ,
संपादक, न्यूज स्टोरी टुडे ….
दि. १८/११/२०२२ रोजी सुरेखा तिवाटने (माई) यांनी वडील व दानशूर कृष्णाजी बाबुराव खुटाळे यांचा
जीवनपट उलगडून त्यांचा जीवन प्रवास समाजासाठी किती प्रेरणादायी आहे याचं खरेखुरे दर्शन घडविले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात त्यांनी
समाजासाठी जी मेहनत घेतली ,समाज घटकाला जी मदत केली आणि सर्वांगीण विकास व प्रगती साधली ही आज ही तितकीच महत्त्वाची आणि प्रेरणादायी वाटते. लेखिका सुरेखा तिवाटने यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹
– दीपक जवकर. डोंबिवली
पुनम सिंगल यांचा पक्षी दरबार आणि पक्षांबरोबर निर्माण केलेला पक्षी प्रेमाचा परिवार फार फार आवडला. प्रेम, दया, माया, दाखवल्यास आपुलकीने पशु पक्षी सुद्धा आपल्या परिवारात येतात तर
तुसडया वृत्तीमुळे दया, माया, क्षमा, प्रेम नसलेल्या ओसाड, भकास वृत्तीमुळे परिवारातील माणसेही दुरावली जातात.
पुनम सिंगल यांच्या अलौकिक प्रेमाच्या, मुलखावेगळ्या परिवाराला शुभेच्छा आणि शुभचिंतन.
– राम खाकाळ. निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे
राष्ट्रीय खेळाडू भावना भेलोंडे यांचा जीवन प्रवास प्रेरणादायक असून युवक युवतींनी विविध खेळांमधे प्राविण्य मिळवणे ही काळाची गरज आहे..
– लक्ष्मीकांत विभुते. नवी मुंबई.
एक यवतमाळ कर म्हणून मला राष्ट्रीय खेळाडू भावना भेलोंडे.. चाळीस गावकर यांचा सार्थ अभिमान आहे… यशस्वी भव…. 🌹
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक,
यवतमाळ
1993 रोजी तपपूर्ती झाली ..याचे वर्णन छान..कविवर्य सुधांशु यांची कविता ही खूप आवडली.
जबाब ओल्या मातीचे ..पुस्तक परिक्षण.. त्यातील कवितांच्या ओळी अतिशय आशयगर्भ..
पुस्तक वाचायला आवडेल.
एस एन डी टी ची माहिती वाचली.
अरुणाजींची कविता आवडली.
पाऊस आणि माणूस, नाट्य छटा आणि
ये ना जरा मर्दासारखा.. तिन्ही आवडले.
– स्वाती वर्तक. मुंबई.
प्रा .विसुभाऊ बापटांचा live कार्यक्रम १९९०-९१ ला धुळे एज्युकेशन सोसायटीच्या B. Ed वर्गाला असताना मला ऐकण्याचा योग आला होता.🙏😊
– दशरथ पाटील. नगर.
मुक्ता वनगुजर यांना आणि त्यांनी केलेल्या कार्याला प्रणाम. 🙏
no other words.
शिल्पा निकम यांची चित्रे सुंदर आहेत. 👍
निसर्ग आणि माणूस.
हे अतिशय सुंदर शब्दात लिहलय असे की, हे स्वःताचे विचार वाटतात ….आपले च शब्द असावेत इतके… श्रीमती सुजाता येवले ना धन्यवाद 🙏
– संगीता सातोस्कर मुंबई.
मुक्ता वनगुजर यांनी संसार सांभाळुन केलेले काम प्रशंसनीय आहे. त्यांना पुढील सत्कार्याकरीता शुभेच्छा💐
सत्यकथा विकर्ण, कादंबरी वरील परीक्षण वाचले. हे नाव सुद्धा मला माहीत नव्हते. धन्यवाद, तोरणे जी 💐
– सुधाकर धारव. यवतमाळ
माझी पत्नी माझा अभिमान ….खरंच खूप ग्रेट स्टोरी.
– शिवानी गोंदाळ. मेकप आर्टिस्ट, मुंबई दूरदर्शन.
ये ना जरा मर्दा सारखा..
या कवितेने मनाला भुरळ घातली.
– विलास प्रधान. मुंबई.
सुधाकर तोरणे यांनी सत्यरथी विकर्ण, या उदय जोशी यांच्या पुस्तकाचा सुरेख परिचय करुन दिला आहे, खरोखरच महाभारतातले हे काहीसे दुर्लक्षित आणि माहीत नसलेलेच पात्र.
पुस्तक वाचायलाच हवे.
धन्यवाद सुधाकरजी !
दीपक महाले यांची अलबत्ता या कवितेत, शिक्षकांची मांडलेली व्यथा मनाला भिडली.
कत्ता नाही याचा अर्थ सांगाल का ?
– राधिका भांडारकर. पुणे
गझल आवडली.
छान पैकी
मार्क देवू या
पैकीच्या पैकी.
– यशवंत पगारे. कवी, गझलकार. बदलापूर
व्वा, सुंदर सर ! अनुदानित शाळेतील शिक्षकांनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे जगणे कवितेतून मांडण्याची महाराष्ट्रातील पहिलीच वेळ तुमच्या कवितेने साधली आहे. खरा कवी असाच दुसऱ्यांच्या वेदना व्यक्त करत असतो.
– कैलास दौंड. (पाठ्यपुस्तकातील कवी)
सगळी सदरे सुंदर आहेत.
रश्मी हेडे यांची जयश्री किवळेकर यांच्यावर लिहिलेली यश कथा आवडली. जयश्रीताईंच्या जिद्दीला सलाम.
कोतापल्ले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
स्वच्छता : अभिनव उपक्रम, छान.
सुमतीमाईंची कविता बालपणात घेऊन गेली.
साऱ्यांसाठी धन्यवाद 🙏🏻
– आशा दळवी. दुधेबावी. फलटण, जि.सातारा.
लोकसेवक जयश्री किवळेकर यांच्या यश कथेवर पुढील प्रमाणे सविस्तर प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
Hey, I’m ashamed to the core for not knowing so much about all this what i just read about your mom and your family overall. Back then I only knew that Amrita’s mother is a corporator. That’s it.
But wow, what an inspiring person Kaku is. Take a bow to this real life Shakti, the Durga who fought life struggles and stood so firm through roughs. No words 😶 She’s is just amazing 💐!
My humble pranams to her🙏 I so admire her.
Lucky you are Amrita !!! Now i get how deep rooted your values of life are. More power to Kaku to serve the society🙏🏼🙏🏼🙏🏼 Congratulations 😊
– Sharad Bhojne. USA
फारच छान. अतिशय प्रेरणादायी जीवन चरित्र, कार्य कर्तृत्व यथोचित शब्दात वर्णन करून सखोल विचार प्रगट करून व्यक्त केल. समाजात आपल्या सारख्या देशभक्त, ईमानदार, प्रमाणित, निष्ठावान, निष्कलंक, चारीञ संपन्न अशाच कार्यकर्ता व समाजसेवकाची गरज असते तरच आपला वार्ड असेल नाहीतर देश असेल त्याची प्रगतीपथावर वाटचाल होते. आपल्या कार्यास व पुढील वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा आपणास. अभिमान आहे आम्हास, आम्हास ही थोडाफार सहवासात काम करण्यास संधी मिळाली आणि आम्हीही धन्य जाहलो. भगवंत आपणास उदंड व निरोगी मंगलमय आयुष्य प्रधान करून पुन्हा समाजसेवक, जनसेवक म्हणून सक्रिय व्हावे 💐🙏
– माजी आमदार श्री चंद्रकांत दानवे.
Wow ! खूप छान लिहिले आहे !
tough journey, amazing energy Congratulations kaku ! 🎉🎉असेच काम करत राहण्यासाठी देव तुम्हाला खूप शक्ती देवो
– संहिता दुबे. अमेरिका
रश्मी तू जयश्री ताईंसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिलीस, खूप छान..👌 प्रेरणादायी लेख..👌👌🙏🙏
– विशाखा खुटाळे. सातारा.
जयश्रीताई किवळेकर यांच्या कार्याचा लेखाजोखा रश्मीताई यांच्या लेखमालेतून आपणास पहावयास मिळाला. जयश्रीताई यांचे बालपण व शिक्षण खामगाव या विदर्भातील शहरात झाले.
इसवी सन 1965 मध्ये जन्मलेल्या जयश्रीताई यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासारख्या संस्कार देणाऱ्या व भारतीय संस्कृती व देशप्रेम, धर्मप्रेम याविषयी प्रेम असणाऱ्या संघटनेत सुरुवातीच्या काळात काम केले. येथेच त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम झाला असे आपणास दिसते. आपल्या सासूचे, सासर्याचे व पतीचे झालेले अकाली मृत्यू यांनी खचून न जाता आपल्या संस्काराचा फायदा समाज, देश आणि धर्म यासाठी त्यांनी व्यतीत केला असे या लेखमालेच्या वाचनातून आपणास समजते.तसेच आज देशात राज्यात जो भाजप पक्ष विस्तारला आहे; सत्तेत बसला आहे ते जयश्रीताई यांच्यासारख्या इमानदार कार्यकर्त्याच्या कामाच्या पावतीवर असे आपणास पाहावयास मिळेल.
तसेच आपल्याला दोन्ही मुली आहेत; मुलगा नाही याची खंत न बाळगता त्यांनी त्यांच्या मुलींचे भविष्य चांगले घडवून त्या चांगल्या कुटुंबात स्थिर झाले आहेत. जयश्रीताई किवळेकर यांच्या पुढील कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏
रश्मीताई यांच्या लेखनाचे माध्यमातून आम्हाला आमच्या दृष्टीआड असणारे एक समाजातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व पहावयास मिळाले. याबद्दल रश्मी ताई यांना पण खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
– योगेश भुजबळ. बीड
जयश्री किवळेकर,
आपणा सर्वांच्या जयश्रीताई वा किवळेकर ताई म्हणजे आमची आवडती विठा मावशी. सामाजिक कार्यकर्ती आहेच पण सगळ्याच आप्त परिवारा साठी, आसपासच्या मैत्रीणीं साठी एक आधारस्तंभ आहे. दुर्दैवाने कै. काका फार लवकरच मोठ्या आजारपणामुळे सोडून गेले. मावशीच्या दोन्ही मुली आज अतिसंपन्न घरात सुखात आहेत. दोघींनाही १ मुलगा १ मुलगी अशी मावशीची चार नातवंडे आहेत. आणि मुलीही आई प्रमाणे च अत्यंत प्रेमळ आणि काही ना काही करत करत असणाऱ्या. धाकटी लेक तर महाराष्ट्रा पासुन दुर आहे तरी तिथेही तिचे सामाजिक काम चालू असतं. मावशीच संस्कार नंतर च्या पिढी तही उतरले आहेत.
निस्पृहपणा तर असा की अनेक मोठ्या नेत्यांच्या सुषमा स्वराज, स्मृती इराणी आणि इतरही मंडळींच्या स्वागताची जबाबदारी आमच्या मावशी वर दिली गेली. पण त्या कोणा सोबतही एकही फोटो तिच्या जवळ नाही..महिला नेत्यांच तर स्वागत ठरलेलेच कारण मावशीच घर ही विमानतळा पासुन जवळच त्यामुळे तिच्या घरी थोडं थांबून कार्य क्रमा स्थळी नेण्याची जबाबदारी ठरलेलीच.
एक विनोदी वाटेल असा किस्सा आजच्या केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या बाबतीत. जवळपास १५ वर्षांपूर्वी अशीच स्मृती इराणी च्या स्वागताची जबाबदारी आमच्या मावशी वर पडली्.त्या घरी पोहचल्यावर आवरून कार्यक्रम स्थळी दोघी पोहचल्या तर त्या महिला मेळाव्यातील उपस्थित महिलां मध्ये तुलसी, तुलसी अशी कुजबूज सुरू झाली तर तुमच्या ह्या किवळेकर ताई त्यांनाच विचारत होत्या की ऐसा क्यों बोल रहे है सब ? तर त्या म्हणाल्याअरे आप को मेरे सिरीयल के सारे मै कूछ मालुम नहीं है क्या ? तेव्हा क्यौ कि सांस …मुळे स्मृती जी लोकप्रियतेच्या शिखरावर ह़ोत्या. असा हा निरपेक्ष स्वभाव.
धार्मिक वृत्ती मुळे घरी कलावती आईंचभजन बाल़ोपासना, नित्योपासना इ उपक्रम राबवणे आणि जवळच्या मंदिरातील कार्यक्रमात सहभाग. आणि सामाजिक कार्य.त्यामुळे टिव्ही, सिनेमा अशा गोष्टी कडे लक्षच नाही.
मला वाटतं जयश्री किवळेकर ताईं सारख्या लहानपणापासून संघाचे संस्कार लाभलेल्या, निष्कलंक आणि कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे च भाजपचा प्रभाव वाढत असावा.त्यांच कार्य पुढे ही असं च चालु राहील अशीच आमच्या कुटुंबा कडुन अपेक्षा आणि पुढील कार्यासाठी होगे पाटीलआणि काळे कुटुंबा कडुन खूप खूप शुभेच्छा !! न्यूज स्टोरी टुडे ला धन्यवाद. आपल्या निमित्ताने मला आमच्या आवडत्या व्यक्ती बद्दल व्यक्त होता आलं.🙏
– सई अभिमन्यु काळे. मुंबई
बांबूवरचा लेख छान.
– प्रिया मोडक
ठाणे
“एक वही, एक पेन”
हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनतीने शिक्षण घेतले. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजले. म्हणून वही, पेन्सिल देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात यावी, हा विचार मला खूप भावला.
– विलास प्रधान. मुंबई.