झाडावर इवलूस पान येत
तेव्हा कोवळ लालसर नाजूक….
जणू नवजात जन्मलेलं बाळ
रक्ताने माखलेलं …..!!
हळूहळू पान मोठ- मोठ होत जातं
तेव्हा अनंत रंग छटांनी भरलेल
जणू तारूण्याच्या उंबरठ्यावरच….
पिंपळपान जसजसं मोठं मोठं होत जातं
तसतसं रंग गडद होत जातात…….
अनेक उन्हाळे-पावसाळे बघितल्याने
त्याच्या शीरा जाड होत जातात
आणि मग हळूहळू पिवळे पडू लागत…
झाडावरून कधी गळून पडेल
सांगता येत नाही ……!!!
आणि एक दिवस असाच हवेचा झोक येतो ……
अन् पिवळे पान अलगद गळून पडते
वार्धक्याचही असच असतं नाही !!!…..
पिंपळपान हृदयाच्या आकाराच
माणसाचे हृदय पिंपळ पानासारखे…
किती साम्य मनुष्य जीवनाचं
आणि पिंपळ पानाच……
पिंपळपानं वहीत, हृदयात जपून ठेवल जात……
आठवणींच्या रूपात हृदयाच्या कप्प्यात……
तुमच्या आणि माझ्या ही….
नाही का….?

– रचना : सौ.मानिनी महाजन. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Khoopch chaan Manini
वाहह.. मानिनी.. खूप सुरेख लिहिलंस..
खरंच.. आपल्या जीवनाशी पिंपळपानाचे किती साधर्म्य आहे. तुझ्या संवेदनशील कवी मनाचे खूप कौतुक !!
खूप सुंदर पिंपळपान मानू.. अख्ख्या आयुष्याचा प्रवास सांगितलासं रचनेतून..