अश्रु चार वाहिले काय, अन
पूर लोटला आसवांचा
जीर्ण जुन्या संवेदनांना
बंध नव्हताच आसवांचा
स्मृति जुन्या जणुं कालच्याच ताज्या
आठवांचा अहोरात्र उजाळा
एक एक आठवणींचा
वाहतो डोळीयातून गंध सोहळा
आठवणीही तशाच ओल्या
मनबंधनाच्या कोषातल्या
उलगडतो धागा धागा
पण, मनांत त्या गुंतलेल्या
मनांत तरी का
प्रश्न पडावा ?
अन अचानक सुटावी एखादी गाठ
कितिक वर्षांची न सुटलेली
व्हावा मोकळा
मनाचा काठ
धाग्यांच्या त्या
मऊ स्पर्शातुन
उत्तराचे बंध जणुं झंकारतात
अनुत्तरित प्रश्नांना तेव्हा, का हो
किती अनेक उपप्रश्न असतात ?
प्रश्न प्रश्नांकित असताना
प्रश्नांनाच असतो
नव संभ्रम
कसं सांगू
काय वाटतं मला
का संवेदनाच असतात अतिचक्रम ?

– रचना : सुनील चिटणीस. खेड – रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
एकंदरीत कविता छान वाटली, आवडली