११ डिसेंबर हा दिवस जागतिक पर्वत दिवस
म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने महाबळेश्वर शहराला देशातील सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून नावारूपाला आणण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान न.पा, स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुधरा अभियान अंतर्गत नेस्ले प्रणित ‘हिलदारी‘ च्या संयुक्त विद्यमाने या दिवशी ‘ट्रॅश हंट‘ या अनोख्या खेळाद्वारे मुन्नावर सोसायटी रोड येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी करत ‘ट्रॅश हंट’ या नाविन्यपूर्ण खेळाबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या खेळामध्ये सुक्या कचऱ्यातील विविध घटक कोड्याच्या स्वरूपात वाक्य किंवा मूहावरे द्वारे दिले गेले होते.
उदा. प्रवासाच्या, सहलीच्या वेळी तुम्ही मला सोबत ठेवतात, मी रंगहिन द्रव्य आहे, मी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही माझा उपयोग करता आणि वापर झाल्यावर कुठेही फेकून देता.
सांगा अशी गोष्ट कोणती ? यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिले रिकामी पाण्याची बाटली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सुक्या कचऱ्यातील घटक तुम्हाला ओळखायचे आहे. जे जास्त कोडे व योग्य कचऱ्यातील घटक ओळखून जास्त सुका कचरा गोळा करतील ते स्पर्धेत विजेते ठरवले जातील.
या नावीन्यपूर्ण उपक्रमात गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, अंजुमन हायस्कुल, सेठ गंगाधर माखरिया हायस्कुल व एम.इ. एस.इंग्लिश मीडियम स्कुल या महाबळेश्वर शहरातील शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

या अनोख्या खेळाद्वारे विद्यार्थ्यांनी हिलदारी ऑफिस ते मुन्नावर हाऊसिंग सोसायटी रस्त्याच्या दुतर्फा पडलेला सुका कचरा गोळा केला. विद्यार्थ्यांनी हसत खेळत या खेळाचा आनंद लुटला. सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक बाटली, कापड, चिप्स व बिस्कीट रिकामी पाकिटे, काचेची बाटली, रिकामे चहाचे कप, थर्माकोल, चप्पल, बूट इत्यादी कचरा क्लूच्या माध्यमातून गोळा करण्यात आला.
मुन्नावर हाऊसिंग सोसायटी नागरिक रस्त्यावरून येता जातांना शाळेतील विद्यार्थ्यांकडे कुतूहलाने बघत होते. नक्की हे विद्यार्थी काय करत आहे ? या विद्यार्थ्यांद्वारे त्यांना स्वच्छतेचा संदेश मिळाला.जंगलात, रस्त्यावर कचरा न टाकता तो वर्गीकरण करून नगरपालिकेच्या घंटागाडीत दिला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही.
शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, या अनोख्या खेळातून क्लू द्वारे आम्हाला सुक्या कचऱ्यातील विविध घटक समजले.आम्ही आता पर्यंत अशी स्वच्छता मोहीम घेतली नव्हती. या नवीन खेळाद्वारे आम्ही आमच्या घरातील कचरा वर्गीकरण करू, परिसर स्वच्छ ठेवू, उघड्यावर कचरा टाकणार नाही, पर्यावरणाची काळजी घेऊ अशा भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘आय लव्ह महाबळेश्वर’ च्या बॅनर वर विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त केले .
या स्पर्धेसाठी गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मुख्यध्यापक श्री. सरपाळे व शिक्षक श्री औघडे, सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलचे मुख्यध्यापक, श्री. राजेंद्र चव्हाण व शिक्षक संतोष ढेबे, अंजुमान हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, सौ. शबाना शेख, शिक्षक सलीम नालबंद, एम. इ. एस. इंग्लिश मेडिअम स्कुलच्या मुख्याध्यापिका, सौ. शीला रसिया व सौ. कल्पना खरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या ट्रॅश हंट अनोख्या स्वच्छता मोहिमेद्वारे एकूण ७६.१६४ किग्रॅ सुका कचरा कचरा गोळा करण्यात आला.
या उपक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुख्य लिपीक आबा ढोबळे, रोहित आतवडकर, सचिन दीक्षित, वैभव साळुंके यांचे सहकार्य मिळाले.
या कार्यक्रमात हिलदारीचे सुजित पेंडभाजे, प्रतिमा बोडरे, अमृता जाधव, आर्तीका मोरे, गौरी चव्हाण इत्यादिनी परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
