यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या “ओपन सिजन” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर द्वितीय पुरस्कार मयुर धामापुरकर दिग्दर्शित ‘मोगरा‘ या मराठी लघुपटाला प्राप्त झाला..
‘रेड पेन‘ या मोहम्मद अब्बासी दिग्दर्शित इराणी लघुपटाला ज्युरी चा विशेष पुरस्कार देण्यात आला.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात
पार पडलेल्या या महोत्सवात अमेरिका, इराण, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश, मराठी, बंगाली, आसामी, कोंकणी, गुजराती, पंजाबी, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधील आणि देशांमधून मोठ्या प्रमाणात फिचर आणि शॉर्ट फिल्म च्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून निवडक ३५ फिचर फिल्म आणि ३० लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात आले.
महोत्सवात ज्युरी म्हणून चित्रपट समीक्षक मीना कर्णिक आणि चित्रपट दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी काम पाहिले.
महोत्सवाचा सांगता समारंभ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव श्रीमती विद्या वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडला.
महोत्सवास चित्रपट रसिकांच्या उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800