इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोशिएशनच्या २२ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.या बद्दल या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम मध्ये नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून 600 हुन अधिक अंध खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत चंकलेलेले महाराष्ट्रातील अंध खेळाडू, त्यांचा खेळ, मिळालेले पदक पुढील प्रमाणे आहे.
१) सोलापूर येथील वालचंद महाविद्यालयात शिकणाऱ्या रुपा खाडे या विद्यार्थीनीने धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक मिळवले.
२) सांगली जिल्ह्यातील विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर मध्ये शिकणाऱ्या कल्याणी छोटे हिने 200 मीटर धावणे यात कांस्य पदक व 400 मीटर धावणे यात रौप्य पदक मिळवलं.
३) पुणे येथील अक्षय सुतार ह्या खेळाडूने लांब उडीत सुवर्ण पदक तसेंच 400 मिटर धावणे यात सुवर्ण पदक, 100 मीटर धावण्यात रौप्य पदकाची कमाई केली.
४) नवी मुंबई येथील मयूर बागल याने 200 मिटर धावणे यात कांस्य पदक मिळवले.
५) ठाणे येथील सारिका बरुड हिने लांब उडीत सुवर्ण पदक मिळवले.
६) नागपूर येथील भारती मावसकर हिने लांब उडीत कांस्य पदक मिळवले.
७) अमरावतीची आंतरराष्ट्रीय खेळाडू ममता कोलमकर हिने गोळा फेक आणि थाळी फेक यात सुवर्ण पदक मिळवले.
या साऱ्या स्पर्धकानी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि आपल्या जिल्हाचे नाव रोशन केले.
साहसी खेळातुन दिव्यांगांचा पुनर्वसन करणारी आईशा फौंडेशन ही भारतातील एकमेव संस्था आहे. 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मुंबईस्थित नेहा पावस्कर व त्यांचे सुपुत्र
आंतरराष्ट्रीय खेळाडू ओम पावस्कर या राष्ट्रीय खेळाडूंचे सहाय्यक प्रशिक्षक होते. या संपूर्ण स्पर्धेत सौं नेहा पावसकर ह्या एकमेव अंध प्रशिक्षक होत्या. तर संघ व्यवस्थापक मृगाक्षी वायकर होत्या.
समर्थ व्यायाम मंदिर मधील राष्ट्रीय खेळाडू अनिश गुरव, वैदही जाधव हे या स्पर्धेतील खेळाडूंचे धावपटू होते. गीतिका वायकर, बसवराज खाडे यांनी स्वयंसेवक म्हणून मदत केली.
पॅरा-ऑलिंपिक इंडिया या दिव्यांगाच्या खेळासाठी प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेशी या स्पर्धा संलग्न आहेत.त्यामुळे या स्पर्धेत प्रमाणपत्र मिळालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता येते. तसेच सरकारी नोकरी मिळण्यासाठीही या प्रमाणपत्राचा उपयोग होतो.
सदर संघास रोटरी क्लब नॉर्थ ठाणे यांच्याकडून राष्ट्रीय स्पर्धस टीशर्ट, जेवण, नास्ता, येण्याजाण्यासाठी तिकीट खर्च दिला गेला. तसेच महाराष्ट्र निवड स्पर्धेतही सकाळी नास्ता, दुपारी जेवण, मेडल, सर्टिफिकेट, पोशाख (टीशर्ट /ट्रॅक पॅन्ट /शूज) याचा ही भार त्यांनी उचलला.
समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेने मुलांना सरावासाठी मैदान आणि वेळोवेळी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले.
या स्पर्धेसाठी जर शासनाकडून मदत मिळाली तर हे खेळाडू नक्कीच जागतिक स्तरावर खेळू शकतील, असा विश्वास वाटतो.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
यामध्ये तीन खेळाडू तर आमची संस्था उत्तम सोशल फॉउंडेशन चे आहेत चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवू नका