मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नुकताच अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा चौथा स्तंभ पुरस्कार आपल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ ला प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी सिंगापूर निवासी, परंतु मुंबईत असलेल्या कवयित्री, लेखिका नीला बर्वे आवर्जून उपस्थित राहिल्या, याचा आम्हाला खूप आनंद झाला.
आजकालच्या पद्धती प्रमाणे त्यांनी दिलेले “रिटर्न गिफ्ट” पुढे सादर करीत आहे.
बर्वे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार.
– सौ अलका,
देवेंद्र भुजबळ.
सहसा मुले करिती आवडीचा व्यवसाय वा नोकरी
कुणी घरचा व्यवसाय पुढे नेती
ही तर आहे जगरहाटी
पण भुजबळ कुटुंबाची गोष्टच न्यारी !
पावले डिजिटल मिडियाची
पत्रकार देवश्रीने ओळखली
अभ्यासपूर्वक गुढी रोवली
‘न्यूज स्टोरी टुडे’ ची !
रुजविताना नवे विचार
गुन्हे, राजकारण
दूर ठेवण्या प्रयत्न
तेच ते उगाळण्यापासून अलिप्त
संस्कृती, साहित्य,
आरोग्य, समाजसेवा
देशप्रेम, खेळ, पर्यटन
सारे आनंददायक
देशोदेशींचे
लेखक कवी वाचक
एकत्र या पोर्टलवर आपसूक
लोकप्रिय जगभर
कामही आल्हाददायक
अन् अचानक आले
एक वळण
देवश्रीस खुणावी
नवी सोनेरी वाट
मास्टर्स इन जर्नालिझम कोलंबिया युनिव्हर्सिटीत झाली निवड !
तरारलेले आपले रोपटे
सोपविले तिने आईकडे
संभ्रमातच स्विकारले तिने
नुकतीच घेतली होती निवृत्ती
होती एमटीएनएलमध्ये नोकरी
न ठाऊक या कामाची माहिती
स्वभाव धाडसी पहिल्यापासूनी
घेतली एकदा जबाबदारी
निभावणार मनापासूनी
देवेंद्र संपादित
अलका निर्मित
पोर्टल होतेय
नियमित प्रकाशित
हा हा म्हणता
पोहोचले ८६ देशात
पाच लाख वाचक
झाले आजतागायत
वाचकांच्या प्रतिक्रिया उत्तेजन देतात
साहित्यिक सारे
आनंदे लिहितात !
मानाचा तुरा खोवला
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
चौथा स्तंभ
पुरस्कार जाहला
विनम्रतेने म्हणती दोघे स्विकारत पुरस्कार
हा तर सर्व लेखक वाचकांचा सत्कार
मज वाटे दोघांचा
फार अभिमान
दशदिशा लोकप्रियता लाभो सदैव
शुभेच्छा माझ्या मन:पूर्वक

– रचना : नीला बर्वे. सिंगापूर. ☎️ 9869484800