ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था आयोजित पहिले फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन पुण्यात खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात नुकतेच मोठ्या थाटात संपन्न झाले.
या साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. ग्रंथदिंडी अॅड.जयश्री बोडेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत संमेलनाध्यक्षा अनिसा सिकंदर शेख, स्वागताध्यक्ष बा.ह. मगदूम, कवी शफी बोल्डेकर, सलीम शेख, अॅड.हाशम पटेल, कार्याध्यक्ष इंतेखाब फराश यांनी पुढाकार घेतला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी मराठी साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कवी शेख शफी बोल्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सत्र पहिले
मुख्य सोहळा सुप्रसिध्द कवयित्री अनिसा सिकंदर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. संमेलनाचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सय्यद जब्बार पटेल यांच्यासह उपस्थित प्रमुख अतिथी बालभारतीचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे, प्राचार्यडाॅ.इ.जा. तांबोळी, गजलकार साबिर सोलापूरी, संपादक अयुब नल्लामंदू, विशाल वडजकर, प्रभा सोनवणे, सीताराम नरके, डाॅ.रेश्मा सय्यद, संदीप बर्वे, रजिया जमादार
आदि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
प्रास्ताविक संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले. यावेळी लेखिका तमन्ना ईनामदार, पुणे यांना पैगंबरवासी अॅड.सिकंदर लतीफ शेख यांच्या स्मरणार्थ युगस्त्री फातिमाबी शेख समाजभूषण पुरस्कार व कवयित्री नसीम जमादार, कोल्हापूर यांना युगस्त्री फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या संमेलनात नसीम जमादार लिखीत “नो मॅन्स लँड” एकांकिका व संमेलन स्मरणिका “स्पंदन” चे प्रकाशन करण्यात आले.
सत्र दुसरे
कविसंमेलनाध्यक्ष अॅड.हाशम इस्माईल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनात नव्वद कवींनी आपापल्या कवितांचे सादरीकरण केले.
संमेलनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने
“फातिमाबी शेख” यांच्या नावाने स्वतंत्र अध्यासन स्थापन करून फातिमांचा गौरव करावा या विषयी मागणी करणारा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.
पुढीलसंमेलन सोलापूर येथे होईल, अशी घोषणा अय्युब नल्लामंदू यांनी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड.जयश्री बोडेकर, शबाना मुल्ला, खाजाभाई बागवान यांनी केले. तर आभार कार्यवाह इंतेखाब फराश यांनी मानले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पुणे शाखेचे अध्यक्ष बा.ह.मगदूम, उपाध्यक्ष शौकत दस्तगीर मुलाणी, सचिव दत्तु भिमा ठोकळे, सहसचिव अॅड.सौ.जयश्री आर. बोडेकर, कोषाध्यक्ष सलीम अ. रहमान शेख, कार्याध्यक्ष इंतेखाब फराश, सुलतान मकबूलभाई शेख, अमर गफूर शेख, सौ. ए. बी. काझी व केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष अॅड. हाशम इस्माईल पटेल, उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, संस्थापक शेख शफी बोल्डेकर, जाफरसाहब शेख आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
good work
good