रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर या महागणपतीसाठी प्रसिध्द असलेल्या गावातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेला लायन्स क्लब बॉम्बे गेटवे ने नुकतीच स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, कुकर, स्टील ग्लास अशा वस्तू भेट दिल्या.
आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या या मुलांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, केवळ परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडून देण्याची वेळ येऊ नये, त्यांनी शिकून मोठे व्हावे यासाठी अशा शिक्षण संस्थांना मदत देण्यात आनंद लाभतो अशी भावना यावेळी युसुफ मेहरअली सेंटरच्या माजी चेअरमन व लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या माजी अध्यक्ष उषा शाह यांनी व्यक्त केली.
तर या शाळेचे मोडकळीस आलेले स्वयंपाकघरही लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या माध्यमातून व्यवस्थित बांधून देऊ असे क्लबच्या प्रेसिडेण्ट माया बजाज यांनी सांगितले.
सर्व पाहुण्यांनीही यावेळी समयोचित विचार मांडले. प्रारंभी मुलामुलींनी सुंदर गीतांनी पाहुण्यांचे स्वागत केले व समुहनृत्येही सादर केली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन महादेव डोईफोडे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब बॉम्बे गेट वे च्या विद्यमान प्रेसिडेण्ट माया बजाज, ग्रामीण विभागीय माजी चेअरमन उषा तेंडुलकर, माजी कॅबिनेट सेक्रेटरी फाल्गुनी शेठ, पत्रकार राजेंद्र घरत, या शाळेची शिखर संस्था श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ-बार्शी चे अधीक्षक आप्पासाहेब मोरे, शाळेचे मुख्याध्यापक सतिश मोरे उपस्थित होते.
शाळा परिचय
२००३ पासून चालवल्या जाणाऱ्या या शाळेत पनवेल, उरण, पेण परिसरातील आदिवासी, पारधी, कातकरी, ठाकरं अशा समुहगटातील १२९ मुली व १२६ मुले शिक्षण घेत आहेत.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
खूपच चांगलं काम…!