भारतात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणे हेच या अपघातांचे प्रमुख कारण आहे.
नागरिकांनी विशेषत: वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे काटेकोपणे पालन करावे यासाठी प्रभावी जनजागृती होणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सध्या रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे.
या अनुषंगाने काल प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपुर तसेच एस टी आगार, वर्धमान नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रा प्र का नागपूर चे श्री साजन शेंडे, मो वा नि श्री पवन येवले, स मो वा नि यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 110 वाहन चालक/वाहक यांची नेत्र व आरोग्य तपासणीही करण्यात आली.
ही तपासणी आयुर्वेल लाईफ केअर मुंबईच्या डॉ. आकोडे मॅडम, डॉ मोरे यांच्यामार्फत करण्यात आली.
या उपक्रमासाठी डेपो मॅनेजर श्री पंकज जुमले,
श्री शेरकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाचा व्हिडिओ आपण वरील क्लिप वर
पाहू शकता.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800