सध्या मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माय मराठी चे गुणगान करणारी, जेष्ठ कवी शांतीलाल ननावरे यांची कविता पुढे सादर करीत आहे.
– संपादक
माझ्या मन मानसित दिसे
एक तेवती ज्योत जोवर आहे
सूर्य चंद्र आकाशात गर्जते ही
मराठी भाषा आसमंतात
शुभ्र नभाचे चांदणे जरी गोळा केले सारे
निळशार सागरातूनी शिंपले जमा
केले ओंजळीत सारे चंद्र
हातात घेवूनी तिचे स्वागत करूया गडे
माझ्या मन मानसित दिसे एक तेवती ज्योत
जाहले उपकार तिचे आम्हावरी
या भूमीत धन्य आहोत आम्ही
सदैव तिच्या कुशीत
ज्ञानीयाने रचिला पाया
कळस तुकोबांनी केला
अमृताते पैजा जिंकी दाखवि जगाला
माझ्या मन मानसित दिसे
एक तेवती ज्योत
मान सन्मान आम्हा देवूनी केल्या आशा
पल्लवित आई म्हणण्याचं
भाग्य दिले आम्हा जन्मात
किती थोरवी गाऊ तिची
साता समुद्रापल्याड
गेली महती तिची जगतात
माझ्या मन मानसित दिसे
एक तेवती ज्योत
– रचना : शांतीलाल ननावरे. नवी मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800