कोरोना काळात सरकार बरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आपापल्या परीने गरजू नागरिकांना मदत करीत आहेत.
नाशिक येथील “स्पर्श मायेचा ” ही स्वयंसेवी संस्था देखील कोरोनाच्या कठीण काळात नाशिक जिल्ह्यातील गरजूंना सक्रिय मदत करीत आहे.

संस्थेने आतापर्यंत रक्तदान शिबीर, कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, आश्रमशाळा, आदिवासी लोकवस्तीत अन्नधान्याचे वाटप केले आहे.

संस्थेने नुकतेच कामतवाडे, जेलरोड, सिन्नर फाटा येथील काही गरजू परिवारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
तसेच ज्या महिला कोरोना काळात विधवा झाल्या त्यांना मदत करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे आदी कार्य संस्था हाती घेणार आहे.

संस्थेच्या अध्यक्ष पूजा आहेर या स्वतः सिव्हिल इंजिनिअर असून निखळ सामाजिक बांधिलकीतुन त्यांनी ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या कामात उपाध्यक्ष सुयोग एंडाईत, कार्यकर्ते सर्वश्री श्रद्धा कोतवाल, समीर शेख, प्रतीक दुसाने, सुशांत उबाळे सक्रिय सहभाग घेत असतात.
ज्या व्यक्ती व संस्थांना नाशिक जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मदत करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या कडील साहित्य, मदत संस्थेला पुढील पत्त्यावर पोहोच केल्यास संस्था त्या साहित्याचे गरजूंना वाटप करेल.
पूजा आहेर, अध्यक्ष,
स्पर्श मायेचा सेवाभावी संस्था,
बंगला नंबर ५, हिरवे फार्म,
भाभा नगर, नाशिक-४२२०११.
मोबाईल क्रमांक: 8888885224.
– देवेंद्र भुजबळ : 9869484800.
सुप्रभात मित्रांनो
आजच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जगभरात हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत अनेक गरजू रुग्णांना व त्यांच्या पारिवारास खारीचा वाटा उचलावा म्हणून अनेक संघटना – संस्था पुढे आल्या आहेत. त्यापैकी स्पर्श मायेचा ह्या संस्थेच्या पुजा आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगले काम करत आहेत यासंस्थेच्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!! तसेच त्यांच्या कार्याला पावती मिळवून देणारे आमचे मित्र सन्मा. देवेंद्र जी भुजबळ यांनाही मनापासून शुभेच्छा!!
राजाराम जाधव,
उलवे, नवी मुंबई
लाठीजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.उपरोक्त संस्थेचे कार्य, उद्दिष्ट पाहून आपण सर्वांनी एकत्र येऊन मदत करणे गरजेचे आहे.
नमस्कार
नाशिक येथील स्पर्श मायेचा सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा पूजा आहेरांनी नासिक परिसरात आजच्या उत्क़ुष्ट कार्य करित असुन त्यांना सर्वीकडुन चांगला प़तिसाद मिळत आहे. त्यांच्या या चांगल्या उपक़मास आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ सरांनी त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोचविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आणि पूजा आहेरांना भविष्यासाठी शुभेच्छा !
मदन रामनाथ लाठी
पुणे
धन्यवाद सर 😊🙏