Friday, March 14, 2025
Homeकलाव्यंगचित्रांचं विश्व

व्यंगचित्रांचं विश्व

उत्कृष्ट व्यंगचित्र हे ते पाहणाऱ्याला लगेच हसवते आणि त्याचवेळी अंतर्मुख देखील करते. काही व्यंगचित्रं
आपल्या कायम स्मरणात राहतात. अशा व्यंगचित्रांचं विश्व उलगडून दाखवतायत प्रसिद्ध व्यंगचित्रकार गणेश जोशी…संपादक.

व्यंगचित्रे आधी फक्त दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असत. आता सोशल मीडियातही ती जास्त प्रमाणात येतात. वृत्तपत्रात बहुधा राजकीय विषयावर व्यंगचित्रे असतात. तर दिवाळी अंकात हास्य चित्रे असतात.

आता सोशल मिडियाचे महत्व आहे आणि अर्थात व्यंगचित्रांचे स्थान, प्रसिद्धीही वाढली आहे. व्यंगचित्रकार सद्य स्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र काढतो. त्यासाठी चालू घडामोडीवर त्याचे बारीक लक्ष असावे लागते.
व्यंगचित्रांचे विषय हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, काही इतरही असु शकतात. त्यात फक्त टीकाच असावी असे नाही तर त्यात हास्य, हलका फुलका विनोद, मार्मिक, मिश्किल भाष्य असावे लागते. कधी सामाजिक संदेश ही असतो.

व्यंगचित्र वाचकाचे पटकन लक्ष वेधुन घेते म्हणून त्याचे महत्व जास्त आहे. मी गेली ३३ वर्षे व्यंगचित्र काढ़त आहे. अनेक दैनिकात, साप्ताहिकात आणि आता सोशल मिडियात ही ती पोस्ट होतात. हिंदी, मराठी, इंग्लिश भाषेतही मी व्यंगचित्रे काढली आहेत व आजही काढ़तो आहे.

माझी आता पर्यंत अनेक व्यंगचित्र प्रदर्शने आयोजित झाली आहेत. सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर नेत्यांनी त्याची उद्घाटने केली आहेत. पर्यावरण, प्रदूषण, झाडे लावा, पाणी वाचवा अशा अनेक विषयांवर मी व्यंगचित्रे काढ़ली आहेत. अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत.

प्रसिद्ध छायाचित्रकार तथा विद्यमान मुख्यमंत्री, श्री. उध्दव ठाकरे समवेत गणेश जोशी 1995 साली प्रदर्शनाचे उद्घाटन करताना.

व्यंगचित्र जर चांगले असेल तर ते आता लगेच व्हायरल होते. तसेच ते चुकीचे असेल तर टिकाही होऊ शकते.
एखादा विषय व्यंगचित्राच्या माध्यमातून परिणाम कारक मांडता येतो.

एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्यंगचित्र रेखाटले जाते त्याला अर्कचित्र असे संबोधतात. तुमच्या कड़े चांगली व्यंगचित्रकला, निरीक्षण शक्ती, वाचनाची आवड चांगल्या कल्पना असतील तर तुम्ही चांगले व्यंगचित्रकार होऊ शकता.

– लेखन : गणेश जोशी, व्यंगचित्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. न्युज स्टोरी टुडे च्या वाचकांच्या प्रतिक्रिया सदरासाठी

    श्री देवेंद्र भुजबळ सरांचा आणि माझा परिचय काही फार जुना नाही. साधारण
    सात आठ वर्षांपूर्वी मी त्यांना सचिवालयात भेटले ( पूर्वीचे सचिवालय आता
    मंत्रालय झालय ) पहिल्याच भेटीत खऱ्या अर्थाने जनसंपर्क अधिकारी म्हणून
    त्यांनी माझ्या मनावर छाप पाडली. मला सह्याद्री दूरदर्शन वाहिनीच्या वृत्त
    विभागात काही काम करून घेण्यासाठी त्यांची मदत अपेक्षीत होती. त्यांना
    भेटल्यावर मी माझ्या संस्थेची माहिती सांगून भेटीचे कारण आणि मदतीची
    अपेक्षा विदित केली. माझ्या स्वर्गवासी आईच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या
    विधायक कार्यकर्ती पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील धडाडीच्या कार्यकर्त्या
    डॉ. पारोमिता गोस्वामी यांची निवड झाली होती. त्यांच्या विधायक कार्याचा
    परिचय संपूर्ण महाराष्ट्राला व्हावा यासाठी साडेनऊच्या बातम्यांमध्ये त्यांना
    पाहुणे म्हणून निमंत्रित करावे अशी माझी विनंती होती. भुजबळ सरांच्या
    शिफारशींवर मी दूरदर्शनवर संपर्क केला आणि माझं काम झालं. त्यानंतर
    मागील वर्षी लॉक डाऊन काळात पुन्हा संपर्क झाला तो न्युज स्टोरी टुडे या
    अभिनव उपक्रमामुळे ! सेवानिवृत्तीनंतर भुजबळ सरांनी हा अतिशय स्तुत्य
    ब्लॉग सुरु करून जनसंपर्क अबाधित ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून
    अभिनंदन ! सामाजिक घडामोडी, दिनविशेष, साहित्य व कला क्षेत्रातील विशेष
    वृत्त, पुस्तक परीक्षण, विधायक कार्य करणाऱ्यांचा परिचय अशा अतिशय रोचक
    आणि संजक विषयांवरचे लेख वाचनाचा आनंद द्विगुणित करतात. रोज सकाळी
    ‘आज काय न्युज स्टोरी?’ अशी उत्कंठा लागून राहते यातच या ब्लॉगचे यश आहे.
    आशा कुलकर्णी – विलेपार्ले मुंबई
    संपर्क : ९८१९३७३५२२.
    ईमेल : antidowry498a@gmail.com

  2. काही थोडेच भाग्यवान आहेत ज्यान्हा ह्या जगात कलेचे वरदान लाभले आहे तुम्ही एक त्याची उंची अशीच वाढत राहो हि सदिच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments