सातारा येथील श्री महाकालिका देवी मंदिरात आयोजित ‘सामूहिक समाज सखी हळदीकुंकू’ छान झाले.
यासाठी प्रथम महिलांची मीटिंग घेण्याचे ठरविले. मिटींगला नेहमीप्रमाणेच महिलांमध्ये उत्साह होता. या मिटींगमध्ये कार्यक्रमाचा दिवस, वाण, अल्पोपहार, तीळवडी हे सर्वांना देण्याचे ठरले.
या व्यतिरिक्त महिलांचे खेळ घेणे, त्या दिवशी रांगोळी काढणे, डेकोरेशन करणे असे सर्व स्वखुशीने प्रत्येकीने स्वीकारले.
28 तारीख जशी जशी जवळ यायला लागली तसा सगळ्यांमधील उत्साह वाढत चालला होता. अल्पोपहार देण्यासाठी प्रसिध्द अभिषेक नळे यांची कचोरी देण्याचे निश्चित झाले. तसा लगेच त्यांना फोन करण्यात आला. त्यांनी देखील कचोरी देण्याचे मान्य केले. त्यांना 140 नग कचोरीची ऑर्डर आम्ही दिली. दोन नगांचे मिळून एक पाकीट याप्रमाणे त्यांनी 70 पॅकेट उत्तमरीत्या पॅकिंग करून मंदिरात आणून दिले. हळदीकुंकू या कार्यक्रमासाठी महिलांना कचोरी लागणार म्हणून त्यांनी दरात सूट देखील दिली.
वाण म्हणून साखर देण्याचे ठरले. त्यासाठी 27 किलो साखर आम्ही महिलांनी आणली. मंदिरात बसून सौ. शितल झूटिंग, सौ. भाग्यश्री कुंदप, सौ. ज्योती कासार, सौ. अमृता पालकर, सौ.मनीषा हेडे यांनी सर्व पॅकिंग केल. सौ. लीना पालकर, सौ. पल्लवी वाडेकर व मी, ज्या दुर राहतात त्यांना फोन करण्याचे काम पार पाडले.
28 तारखेला सकाळी बारा वाजता येऊन सौ.अमृता पालकर, सौ. ज्योती कासार, सौ. लीना पालकर, सौ. सोनल खुटाळे यांनी सुंदर असा सेल्फी पॉईंट सजवून तयार केला. त्याला लागणारे सर्व साहित्य प्रत्येकीने आपापले आणले होते. अतिशय सुंदर असा सेल्फी पॉईंट सजवण्यात आला. यासाठी चौघींचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे.
अतिशय कोरीव व सुबक रांगोळी सौ.भाग्यश्री कुंदप, सौ.सोनल खुटाळे व सौ.ममता कुंदप या तिघींनी मिळून काढली.
हळदी कुंकवाचे ताट तयार करणे व सुंदर अशी भाज्यांची रांगोळी सौ. पल्लवी वाडेकर हिने स्वखुशीने काढली. या सर्व कार्यक्रमाला माईक व स्पीकर असल्याशिवाय मज्जा येत नाही, त्यासाठी सौ. मनीषा हेडे यांनी स्पीकरची सोय केली.
देवीला हळदी कुंकू, तिळवडी व वाण देऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महिला जमल्यावर सर्वांना खाली बसवून सुंदर आवाजात देवीला वंदन करून देवीचे स्तोत्र सौ. मनीषा हेडे, सौ. सुवर्णा रांगोळे व सौ. सुनिता खुटाळे यांनी गायले.
नेहमीप्रमाणे पल्लवीने पहिला खेळ घेतला. त्यात सर्व महिलांनी उत्स्फूर्त व आनंदाने भाग घेतला. सगळ्यांना आनंद देणारा असा हा खेळ होता. या खेळात ज्या कोणी जिंकत होत्या त्यांना बक्षीस म्हणून कॅडबरी देण्यात आली. त्याच उत्साहात नंतर दुसरा खेळ सोनलने घेतला. ‘तळ्यात मळ्यात’ हा खेळ होता. त्यालाही सर्व महिलांची उत्स्फूर्तपणे पसंती मिळाली. त्यानंतर तिसरा खेळ रेणुका व सोनल या दोघींनी घेतला. तो खेळण्यासाठी सर्व महिलांनी व उपस्थित मुलींनी पसंती दाखवली व खूप आनंद घेतला.
हे सर्व झाल्यावर सौ. सुनिता खुटाळे यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू लावले. सौ.उल्का पाटील यांनी तिळगुळ व अत्तर लावले. सौ. साधनाताई कासार यांनी कचोरीचे पॅकेट दिले, तर सौ. सुचिता कोकिळ हिने सर्वाना हळदीकुंकू निमित्त वाण (साखर) सगळ्यांना देण्याची सेवा मनापासून केली.
या अशा कार्यक्रमांमध्ये सर्वात महत्त्वाचे असे महिलांचे छान छान फोटो काढणाऱ्या आपल्याच मुली म्हणजे कु. मृणाल कोकीळ, कु. समृद्धी कासार, कु. श्रावणी कुंदप, कु. स्नेहा पालकर, कु. अनुराधा पालकर यांनी सर्वांचे फोटो काढलें.
अशा या आपल्या हळदीकुंकू या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांमुळे शोभा आली. ज्यांना काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही त्यांची उणीव भासत होती.
पुढील कार्यक्रमास आपण सर्वजणी त्याच जोशात व उत्साहात पुन्हा भेटू. महाकालीका देवी ट्रस्टच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
– लेखन : सौ.पौर्णिमा कुंदप.
विश्वस्त, महाकालिका देवी ट्रस्ट, सातारा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800