Wednesday, February 5, 2025
Homeबातम्यासार्वजनिक सेवा प्रसारण : मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक सेवा प्रसारण : मार्गदर्शक सूचना

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “भारतात टेलिव्हिजन वाहिन्यांचे अपलिंकींग आणि डाऊनलिंकिंग, 2022”  विषयी 09 नोव्हेंबर 2022 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार खाजगी वाहिन्यांना दररोज 30 मिनिटांसाठी सार्वजनिक सेवा प्रसारण करावे लागेल.

खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्या प्रसारणकर्ते आणि त्यांच्या संघटनांसोबत मंत्रालयाने या संदर्भात अतिशय विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारे 30 जानेवारी 2023 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

या सूचनेनुसार मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की प्रसारण करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाविष्ट असलेला संबंधित आशय हा सार्वजनिक सेवा प्रसारण म्हणून समजण्यात येईल. तसेच हे देखील स्पष्ट करण्यात येत आहे की एकाच वेळी 30 मिनिटे कालावधीमध्ये या आशयाचे प्रसारण करण्याची गरज नाही. त्याऐवजी तितक्या कालावधीची लहान लहान भागात विभागणी करून त्याचे प्रसारण करता येऊ शकेल. प्रसारकाने याबाबत प्रसारण सेवा पोर्टलवर मासिक अहवाल ऑनलाईन सादर करण्याची गरज आहे.

प्रसारणाच्या विषयामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सामाजिक संदर्भाचा खालील विषयांसह आशय समाविष्ट असला पाहिजे. हे विषय आहेत..

शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार; कृषी आणि ग्रामीण विकास; आरोग्य आणि कुटुंब कल्याण; विज्ञान आणि तंत्रज्ञान; महिला कल्याण; समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण; पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता, खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्यांकडून ऐच्छिक अनुपालन आणि स्वयं प्रमाणनाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रसारण साध्य करण्याचा या मार्गदर्शक सूचनेचा उद्देश आहे.

या मार्गदर्शक सूचनेची प्रत hhtp:// mib.gov.in/ sites/default/ files/advisory येथे उपलब्ध आहे.

– टीम एनएसटी. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी