Saturday, March 15, 2025
Homeबातम्याकोरोना : शिक्षक मित्रांची जाण !

कोरोना : शिक्षक मित्रांची जाण !

कोरोनाच्या वैश्विक महामारीनं संपूर्ण जगभरा सोबतच आपल्या देशात घातलेल्या महाभयंकर थैमानामुळे जनतेच्या मनात माजलेल्या भीतीच्या काहूरानं होत्याचं नव्हतं केलंय.

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या जिवाभावाची माणसं आपल्याला सोडून जाताना पहावं लागतंय, आणि अश्यातच ह्या संकट समयी कुणासाठी आपण जर मदतगार ठरलो तर या पेक्षा मोठं ते काय ?

याच उदात्त भावनेतून माणुसकीचा वसा जोपासत रायगड जिल्ह्यातील पिरकोन – उरण येथील पंचरत्न अध्यापक विद्यालयाच्या सन १९९४ ते १९९६ डी.एड. तुकडीचे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी, जे सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात नोकरी निमित्त कार्यरत असले, तरी पण ज्यांनी आपली नाळ हि आपल्या जन्मभूमीशी कायम ठेवली आहे, त्यांच्या या ज्ञानगंगेच्या भगीरथांच्यां औदार्यातून “समर्पित कोविड सेंटर, उरण”  येथे उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणाऱ्या साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

या साहित्यात ४०० पॉकेट्स मिक्स ड्रायफ्रुट, १५० पॉकेट्स ओ.आर.एस.एल, ५०० बॉटल्स पिण्याचे पाणी या साहित्याचा समावेश असून ते सर्व हे सर्व डॉ.भद्रे, डॉ.भवसार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष जी पवार यांच्याकडे शिक्षक मित्र सर्वश्री कौशिक ठाकुर, विकास पाटील, प्रशांत कोळी, उपेंद्र ठाकूर यांनी सुपूर्द केले.

पंचरत्न अध्यापक विद्यालय पिरकोनच्या सन १९९४- ९६ च्या तुकडीतील शिक्षक मित्र-मैत्रिणी महेंद्र गावंड, धीरेंद्र ठाकूर, विकास ठाकूर, वनिता पाटील, प्रतिभा कुडेकर (पनवेल ), बापू जायभार सर ( अहमदनगर), सुनिता पाटील (पेण ), संगिता पाटील, विनोद पाटील, देविदास पाटील, उपेंद्र ठाकूर, गणेश म्हात्रे ,अविनाश नवाले, सतीश गावंड, नवनीत माळी, जयश्री गावंड, छाया गावंड, सुरेखा मुंबईकर, कौशिक ठाकूर, प्रशांत कोळी, पुष्पा मोकल, प्रमिला म्हात्रे, करुणा मोकल या सर्व मंडळींनी एकत्र येत केलेल्या ह्या आदर्शवत कार्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अनिल घरत.

– लेखन : अनिल घरत.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments