तुझे काळेभोर दोन डोह
साक्ष आहेत तुझ्या निष्पाप मनाचे
जितके गहिरे तितकेच बोलके
म्हणूनच साक्षी होतात भावरसाच्या नवरंगांचे
त्या काळ्या डोहात डोकावताना
जाणवले विविध भावनांचे तरंग
कधी मिश्किलीने ते उचंबळतात
तर कधी वेदनेने ओसंडतात
त्या काळ्याभोर डोहात डोकावताना
अंधारल्या विश्वाचा काळोख बोलतो
त्याच डोहात डोकावताना
मानवतेचे रंगही ओळखतो
त्या दोन डोहांची साथ ओळखते प्रेमाची आस
जाणवून देते मायेची ऊब
आणि आपुलकीच्या नात्याची भूक
तुझे काळेभोर दोन डोह सांभाळून ठेव
त्यातील निरागसता
वेदनेने झाकोळले ओसंडले तरी
येऊ देऊ नको कधीही त्यात क्रूरता

– रचना : प्रसाद मोकाशी. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800