आज जागतिक कर्करोग दिन आहे. या निमित्ताने माझ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्या आपल्याला नक्कीच धीर देणाऱ्या वाटतील म्हणून मी शेअर करतेय….
आमचं g2g नुकतंच पार पडलं. खूप एन्जॉय केलं.
मागे वळून पाहताना आजचा हा दिवस केवळ आणि केवळ ज्यांनी माझ्यावर चांगले उपचार केले, मनाला धीर दिला, उमेद वाढवली आणि अर्थातच आपलं नशीब यामुळेच मी बघतेय.

तब्येत बरी नाही म्हणुन मी मैत्रिणी सोबत डॉ. कडे जाऊन औषध आणले. पण तरीही काही फरक पडला नाही आणि त्याचवेळेस लेकीचा सहज चौकशी करायला फोन आला. तर आवाजावरून तिला समजलं, आईला बरं वाटतं नाहीये म्हणून तिने तिच्या फॅमिली डॉ. कडे नेलं. तर त्यांना शंका आली म्हणून त्यांनी सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन करुन घेतलं आणि या कर्करोगाचं निदान झालं.
परंतु मला कळू न देता, जुजबी आहे असे सांगून प्रसिद्ध गायनोकॉलॉजिस्ट डॉ रेखा डावर यांच्याकडे गेलो. त्यांनी सर्व तपासण्या करून ताबडतोब ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. त्या प्रमाणे लगेच ऑपरेशन करून घेतलं. अर्धा तास चालेल, असं वाटणारे ऑपरेशन सहा तास चाललं. त्यावेळी डॉ. डावर मॅडमनी अगदी ऑपरेशन थिएटर पर्यंत सोबत, अगदी भूलीचे इंजेक्शन देतानाही धीर देत हात धरला, ऑपरेशन चालू असतानाही मी इथेच आहे, परत हात धरला. ऑपरेशन करणारे डॉ. परेश जैन यांचे वेळोवेळी धीर देणारे शब्द, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.
केमोथेरपी विषयी असलेल्या माझ्या बारीकसारीक शंका कुशंकांचे निरसन केले. केमोथेरपी देणारे
डॉ मोहन मेनन आणि त्यांचा स्टाफ यांनी सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे घेतलेली काळजी हे खरंच विसरता न येणारे आहे.
ऑपरेशन नंतर ICU मध्ये मला भेटायला आल्यावर, नकळत डोळे पुसणारे आणि चेहऱ्यावर हसू आणून माझ्या तब्येतीची चौकशी करणारे माझे भाऊ, ज्या वेळेस ऑपरेशन नंतर कर्करोग झाल्याचे डॉ डावर यांनी सांगितले आणि जो काही शाब्दिक धीर, मानसिक बळ दिले तो क्षण. मला केमोथेरपी साठी धीर देणारी माझी मुलगी, भाची यांचे धीराचे हात मी विसरू शकत नाही.

अर्थात घरच्यांची आणि माझ्या मित्रमैत्रिणीची मनोमन साथ या मुळे कर्करोगावर मी यशस्वी मात करू शकले.
प्रत्येक केमो च्या वेळेस पतीची, त्यांच्या ऑफिस स्टाफची, मुलीची, वहिनींची, भावांची, भाच्यांची मिळालेली अनमोल साथ. ऑपेशन नंतर हॉस्पिटलमध्ये, भाच्यांची भरवलेला एक एक घास, डॉ डावर, परेश जैन, डॉ मेनन हे राऊंड आल्या वर त्यांचा वेळोवेळी मिळालेला शाब्दिक आधार. नातेवाईक, मैत्रीणी यांनी दिलेला मला वेळ. त्यामुळे मनाला मिळालेली उमेद मी विसरुच शकत नाही.
माझ्या केमो संपल्यावर सुद्धा 8 मार्च या जगातिक महिला दिनी डॉ. डावर मॅडम या पुष्पगुच्छ घेऊन मला भेटायला आल्या तो क्षण तर अवर्णनीय आहे. त्यानंतर माझ्या पुनर्मजन्मदिनाचा पहिल्या वाढदिवशी माझ्या ऑफिसच्या मैत्रिणी केक घेऊन घरी आल्या आणि मला सरप्राईज दिलं. तो दिवस तर खरंच माझ्या साठी खासचं होता हे सर्व क्षण मी नाही विसरू शकत.
आता १८ एप्रिल रोजी माझ्या पुनर्जन्मचा 5 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
म्हणूनच या जागतिक कर्करोग दिनानिमित्त मैत्रिणींना, आपणा सर्वांना सांगू इच्छिते की, आपल्यात उपजतच सहनशक्ती असतेच पण असं काही झालं तर घाबरून जाऊ नका. फक्त आपल्या माणसांसाठी आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. म्हणजे अशा आजारावर नक्कीच यशस्वी मात करता येते.माझ्या स्वानुभवावर आधारित मी कॉमा पुस्तक लिहिले. पुढे याच पुस्तकावर आधारित याच नावाचा माहितीपट तयार करण्यात आला.
३ वर्षांपूर्वी जागतिक कर्करोग दिनी या माहिती पटाचे प्रकाशन मुंबई येथील राज भवनात राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते झाले.
पुढे आम्ही “कॉमा संवाद उपक्रम ” सुरू केला.या उपक्रमात कॉमा माहिती पट दाखविणे, माझे अनुभव कथन,संबधित संस्थेने बोलाविलेले डॉक्टर यांचे मार्गदर्शन, कॉमा पुस्तक उपलब्ध करून देणे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष शंका समाधान असे स्वरूप असते.
मुंबई प्रेस क्लब, ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय, नवी मुंबई महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्र विद्या विभाग आणि अन्य काही ठिकाणी छान कार्यक्रम झाले. पण पुढे कोरोना मुळे त्यात खंड पडला. आता पुन्हा हा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. असो…
आणि हो, आपल्याला काही मदत, मार्गदर्शन लागल्यास, मला नक्कीच फोन करा !
आपलीच सखी
सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अलका ताईंचे खरेच कौतुक आहे धीराने घेऊन वेळीच केलेले उपचाराने मोठ्यात मोठ्या कर्क रोगासारख्या आजारातून बरे होता येते हेच आम्हा सर्वांना शिकता येईल, शुभेच्छा.
तुझ्यातील वाहणारा आनंदाचा, उत्साहाचा, सर्वांना प्रेरणा देणारा आणि कर्करोगासारख्या भयावह आजारावर मात करून नवा जन्म नव्याने जगण्याची उमेद, अखंडीत राहो !
तुझ्या या शक्तीला आणि उमेदिला सलाम !
सौ. वर्षा भाबल.
अलका ताई चा संघर्ष आम्ही अगदी जवळून पाहिला आहे.प्रचंड सकारात्मक विचार व जिद्द हि अशक्य हि शक्य करून दाखवते ह्या प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमच्या अलका ताई 👍
नंतर हि स्वतः ची काळजी घेऊन विविध विषयावर व्याख्यान देणे.सोसायटी असो व ऑफिस चा कार्यक्रम सगळे मॅनेजमेंट अगदी परफेक्ट संभाळणे.
पर्यटकांना चा मनापासून आनंद घेणे . किती हि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून सतत हसतमुखा ने काम करणाऱ्या आमच्या लाडक्या नंनद बाई अलका ताई तुम्हाला तुमच्या कार्यत खुप खुप यश मिळो.उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच मनापासून सदिच्छा.🙏😍
अलका, तुझ्यातली जगण्याची उर्मी, तूला चांगलच बळ देत आहे. तुझे विचार वैश्विक आहे. तू सर्वाना आयुष्यातला प्रत्येक क्षण, आनंदानी जगायला शिकवते. सुखदूःख, आजार, आरोग्य, यश, अपयश येतात जातात पण आपले
मन धाडसी सकारात्मक असेल तर कुणीही त्याला मात करून शरीर आनंदी आरोग्यमय करून दाखवू शकतो.हे तू करून दाखवले.तुझ्याकडून अनेकांना प्रेरणा मिळते.
अलका,तुला आरोग्यदायी शुभेच्छा व पुढील नविन उपक्रमासाठी सदिच्छा.
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या
अलका ताई ग्रेट अनुभव आहे आपला हात करताना धीर धाडस शब्दांच्या पलीकडले सलाम करावासा वाटतो
आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या