धुक्याची चादर पांघरली कशी
घनःश्याम सावळ्या रंगाची जशी
धुक्याचे फवारे उडवतो कोण
रविराज मात्र पाळतात मौन
समीर वाहतो मंदमंद हळुवार
स्पर्श मनमोहक वाटे अलवार
धुके राव आपले असते सदा गुढ
असा कसा असतो तुमचा हो मुड
हिरव्यागार वनराईला झाकोळता
चराचरांना मात्र नेहमी लोळवता
काळा काळा कापूस कुठे लपवता
अदृश्य रुपात जादूने बोलवता
काळ सावळे रूप घाबरवते फार
एकमेका टकरावता करता प्रहार
काळे रुप पाहून पवन ओरडतो
मत्सरांचा उत फारच वाढतो

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800