“दाह” या शीर्षकाची सौ सुमती पवार यांची कविता आपण काल वाचली. आज याच शीर्षकाची श्री अरुण पुराणिक यांची कविता वाचू या.
दोघांच्याही कवितेचं शीर्षक एकच पण दृष्टिकोन वेगवेगळा !
– संपादक
दाह मनाचा असा भयंकर
किती सोसू रे देवा ।
संस्कारी, सुखी जीवनाचा
कुठे सापडेल मज ठेवा ।।१।।
वागणे असे अमानवतेचे
कुठे चालला हा प्रवास ?
चुकलेली वाट दिसता
सरळ मार्गाचा होतो ऱ्हास ।। २।।
लोभ मत्सर हेवे दावे
कुणी कुणाशी का करावे ।
असुरी वृत्ती अशी कशी ही
जीवन असे कधी नसावे ।।३।।
विक्षिप्त वृत्ती मानवाची
दाह मनीचा आहे अपार ।
संस्काराची पूजा असता
जीवना येई आकार ।।

– रचना : अरुण पुराणिक. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800