गंजल्या मनाचे
तोडून कुलूप
मीही घेत आहे
नभात, या झेप।
जुन्या ह्या शृंखला
मनाच्या मनाला
आतून गच्च मी
शोधते स्वतः ला।
असे प्रश्न आले
हे बाईपणात
झाले मी फितूर
माझ्याच देहात
बंदिस्त गुहेत
संज्ञा अंतहीन
कधी सापडावा
झरोका नवीन।
प्रकाशा सवेही
नवी वाट यावी
आणिक माझीही
नवी वीज व्हावी।

– रचना : अनुपमा मुंजे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
