Tuesday, September 16, 2025
Homeबातम्यामहाबळेश्वर : इको दोस्त

महाबळेश्वर : इको दोस्त

“ग्रामपंचायत क्षेत्र” महाबळेश्वर व क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिरात नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत इको दोस्त उपक्रम राबविण्यात आला.

महाबळेश्वर शहरातील महत्वाचे आणि पवित्र तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. यावेळी महाबळेश्वर देवस्थान यांच्याकडून भाविकांना तिर्थप्रसादाची व्यवस्था देखील केलेली असते. त्यामुळे कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. यासाठी दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यावरण पूरक इको-दोस्त कार्यक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात कचरा निर्माण होण्यापासून तर त्याची योग्य ती विल्हेवाट संपूर्ण प्रक्रिये मध्ये कुठेच पर्यावरणाला हानी होणार नाही आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली गेली.

या उपक्रमात हिलदारी टीम मार्फत मंदिरात येणाऱ्या  भाविकांना पर्यावरण पूरक इको-दोस्त उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.  येणाऱ्या सर्वांनी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखताना स्वच्छता पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितल्या गेले. यात कचरा वर्गीकरण व  कचऱ्याचे चार प्रकार याबाबत सांगून ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा, घरगुती बायोमेडिकल कचरा  व वर्गीकरण का करायचा त्याचे फायदे व तोटे समजावून सांगितले.

या उपक्रमादरम्यानच निर्माण होणारा ओला कचरा व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठीची व्यवस्था देवस्थानाच्या मदतीने करण्यात आली होती. सदरील उपक्रम पाहून अनेक भाविकांनी या नियोजनबाबत समाधान व्यक्त करताना प्रतिक्रिया दिल्या की, आज महाशिवरात्रीच्या दिवशी एवढ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी आपण सर्वजण कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम करत आहात.  याठिकाणी अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणावरून येत आहेत या सर्वांना माहिती देवून तयार झालेला कचरा कुठे उघड्यावर न पडू देता तो वेगळा संकलित करत आहात हे कौतुकास्पद आहे.

सदर उपक्रमा दरम्यान ओला व सुका कचरा मिळून एकूण ५५५.६४ किलोग्रॅम वर्गीकृत कचरा संकलित केला गेला. यामध्ये सुका कचरा १६५.५४ किलोग्रॅम व ओला कचरा ३९०.१० किलोग्रॅम गोळा करण्यात आला.

या उपक्रमासाठी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर क्षेत्र महाबळेश्वर ग्रा.प. चे सरपंच श्री सुनील बिरामणे, उपसरपंच, सौ. सारिका पुजारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट व  व्यवस्थापक तसेच क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमासाठी हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी, राम भोसले, प्रतिमा बोडरे, खाकसारअली पटेल, फैयाज वारूनकर, अमृता जाधव, अंकिता गावडे, आर्तीका मोरे, गौरी चव्हाण, सुरज मोरे, अनुराग खरे इत्यादिनी परिश्रम घेतले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments