सांगू कसे तुला मी तू लाजते अशी की
प्राजक्त रातराणी हसते कळी जशी तू …
डोळ्यात प्रेमभाव ओसांडूनी वहातो
झुकते नजर खाली मी वाहूनच जातो
घुंगर बट तुझी वाऱ्यावरी अशी की …
सांगू कसे तुला मी ….
ते कुंदकळ्या दात मोतीच सांडतात
आणि बटा अशा त्या वाऱ्यास भांडतात
अनिमिष नेत्र माझे खिळतात ते असे की..
सांगू कसे तुला मी ….
मधुबोल ऐकण्यास आतुर कर्ण माझे
लाजाळूचे तू झाड दडतेस मागे मागे
सामोरी येत नाही ठेवते मला उपाशी..
सांगू कसे तुला मी….
स्वप्नी तूच छळते प्रत्यक्ष सावली तू
मी फक्त तुझा राणी ठेवू नकोस किंतू
तू हास एकदाच खुदकन् तू अशी की …
सांगू कसे तुला मी …

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800