स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उद्या, २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त त्यांना नमन..
संपादक
अंदमानच्या निळ्या सागरी उसळत होत्या लहरी
स्पंदनातूनी उमटत होते तरंग ते अंतरी
तळमळ तेथे क्रान्तीवीरांची गाथा चैतन्याची
तळपत होते क्रान्तीसूर्य ते प्रचिती तेजाची
जनन मरणही व्याख्या त्यांची अलौकिक आगळी
उपासना स्वातंत्र्यदेवीची भक्ती जगावेगळी
असिधाराव्रत अंगिकारूनी वाण सतीचे धरले
जीवनकमला करूनी समर्पित धन्य जीवनी झाले
ब्रिटिशांनाही पुरूनी उरले भाग्यशाली त्यांतले
जिद्दी निग्रही कणखर राहूनी पोलादा भेदले
अभिमानाने उभा आजही ‘सेल्यूलर’ जेल तो
क्रांतीफुलांच्या अमर कहाण्या जगास जो सांगतो
तीर्थक्षेत्र हे भारतीयांचे स्थंडिल धगधगते
स्मरण क्रान्तीवीरांचे होतां मस्तक नत होते

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800