न्यूज स्टोरी टुडे, www.newsstorytoday.com या वेबपोर्टलच्या निर्मात्या म्हणून या पोर्टलच्या माध्यमातून सतत समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असल्याबद्दल, कॅन्सर ग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर, दिलासा देण्यासाठी तत्पर असलेल्या सौ अलका भुजबळ यांना भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सेवा फाउंडेशनच्यावतीने नुकताच माणुसकी सेवा गौरव पुरस्काराने नाशिक येथे गौरविण्यात आले.
अभिनेत्री पल्लवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, माणुसकी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष दादाभाऊ केदारे, सल्लागार अशोक कुंदप आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सर्व मान्यवर मंडळींनी समयोचीत भाषणे केली. कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्प परिचय
‘न्यूज स्टोरी टुडे’ या आंतरराष्ट्रीय वेबपोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ अलका भुजबळ सुपरिचित आहेत. आज हे वेबपोर्टल ८६ देशात पोहोचले असून ४ लाख ७६ हजार इतके त्याचे व्ह्यूज आहेत. या वेबपोर्टल ला आता पर्यंत चौथा स्तंभ, एकता पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
कॅन्सर वर यशस्वी मात केलेल्या सौ अलका भुजबळ महिलांमध्ये कॅन्सर विषयक जन जागृती व्हावी, यासाठी सतत कार्यशील आहेत. कॅन्सर च्या स्वानुभवावरून लिहिलेले त्यांचे “कॉमा” पुस्तक प्रसिध्द डिंपल पब्लिकेशन ने प्रकाशित केले आहे. याच पुस्तकावर आधारित, “कॉमा” ही डॉक्युमेंटरी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मध्ये विमोचीत करण्यात आली आहे.
सौ अलका भुजबळ या आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात सतत सक्रिय असतात. त्यांनी दामिनी, बंदिनी, पोलिसातील माणूस, महाश्वेता, हे बंध रेश्माचे, आई अशा विविध लोकप्रिय दूरदर्शन मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
त्यांना आता पर्यंत विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विविध विषयांवर त्यांचे लिखाण चालू असते तसेच, ‘जीवन प्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने त्यांनी आता पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात प्रवेश केला आहे.
– टीम एनएसटी. 9869484800.
सौ अलका भुजबळ यांचे त्रिवार अभिनंदन💐, आपण अश्याच कार्यरत राहण्याकरिता ईश्वराने आपल्याला उत्तम आरोग्य द्यावे ही प्रार्थना.🙏
शतशः आभार
News Sotry Portal या माध्यमातून सामाजिक सत्यांना प्रकाश देणा-या आणि विविध सामाजिक ,शैक्षणिक आणि साहित्यविषयक उपक्रमांतून समाजकार्य करणाऱ्या अलकाताईंचा सत्कार हा अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहे.भुजबळ दांपत्याने केलेल्या निरलस कार्याची ती पावती आहे.
मनापासून हार्दिक अभिनंदन.
🤝 सर
पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन काकू 💐💐
🤝🤝 आभारी आहे
🤝🤝tq
अलका ताई खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐
तुमच्या कार्याची खुप छान सन्मान देऊन दखल घेतली आहे.खुप छान सुंदर 💐💐💐💐
धन्यवाद मंदा
🤝🤝tq tq मंदा
अभिनंदन अलका! Proud ऑफ यू. यू deserved it.
🤝🤝tq प्रीती
🤝🤝 प्रीती
आदरणीय अलका ताई
नमस्कार
पुरस्काराबद्दल खुप खुप अभिनंदन !
–
मदन लाठी
सामाजिक कार्यकर्ता & पत्रकार
जळगाव
धन्यवाद लाठी साहेब
अलका अभिनंदन अभिनंदन
तुला शतशः करावे वंदन
तुझी मेहनत, तुझे कष्ट
तू कामात सदा व्यस्त.
उच्च आचार, उच्च विचार
असेच मिळो सतत पुरस्कार
सदोदित तुला नमस्कार
अलका माझा त्रिवार नमस्कार
आभारी आहे पूर्णिमा
🤝🤝🤝 पूर्णिमा मनापासून आभार
हार्दिक अभिनंदन मॅडम💐💐
🤝 सुजाता मॅडम